देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर दि. २३- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) कार्यालयामार्फत सन २०२५-२६ या वित्तीय आर्थिक वर्षामध्ये इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिक इत्यादी अभ्यासक्रमामध्ये सरासरी ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणा-या मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थी- विद्यार्थीनींना निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती मंजुर करण्यात येणार असून यासाठी १५ जुलै २०२५ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक गोकुळदास जे. पगारे यांनी केले आहे.
अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, मार्क मेमो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याबाबतची रजिस्ट्रेशन पावती/ बोनाफाईड, मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, एक पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
मातंग/मांग समाज व तत्सम १२ पोट जातीतील विद्यार्थी -विद्यार्थीनींनी दि. १५ जुलै २०२५ पर्यंत आवश्यक कागदपत्रासह अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर मनमाड रोड, सावेडी अहिल्यानगर येथे सादर करावेत, असेही कळविण्यात आले आहे. यानी केले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा