
मुंबई: आपल्या आवाजाने जगावर अधिराज्य गाजविणाऱ्या सप्तसुरांची जादू आज कायमची हरवली आहे.
भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. या बातमीने संपूर्ण सिनेविश्वासात शोककळा पसरवली आहे. महिनाभरापासून त्यांचे चाहते आणि कलाकार त्यांच्या प्रकृतीसाठी सतत प्रार्थना करत होते.
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा बिघडली होती. सुरुवातीला त्यांना कोरोना आणि न्यूमोनियामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर आलं. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आलं.
8 जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून लता दीदी अतिदक्षता विभागात होत्या.
लता दीदी या आयसीयूमध्ये होत्या. यावेळी डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना त्यांना भेटण्यास मनाई करण्यात आली होती. कारण त्यांना कोरोनाची लागण झाली होती. लता दिदींच्या निधनाने देशावर शोककळा पसरली आहे.