छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार-आचार आजही प्रेरणादायीच – सुरेंद्रसिंग घारु
दलित महासंघाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

अहमदनगर (प्रतिनिधी) – काळाची पावले ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी कार्य केले. आपल्या सहकार्यांना, मावळ्यांना प्रेरणा देत सांघिक भावना निर्माण केली. स्वत: आघाडीवर राहून ते प्रेरणा देत. त्यांनी कधीही कर्मकांडांचे स्तोम माजविले नाही. माणूस हा धर्मासाठी नाही तर धर्म माणसासाठी आहे याची शिकवण त्यांनी प्रत्यक्षात आणून दिली. अशा थोर महापुरुषांचे विचार, आचार हे समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी राहतील, असे प्रतिपादन दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रसिंग घारु यांनी केले.
बाराबाभळी येथे दलित महासंघाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच श्री.मोरे, नाना चंद्र उबाळे, युवक जिल्हाध्यक्ष सुरेंद्रसिंग घारु, महिला जिल्हाध्यक्षा अरुणाताई कांबळे, तालुकाध्यक्षा अर्चनाताई सत्रे, भिंगार शहराध्यक्ष प्रविण जाधव, युवक अध्यक्ष वरुण वाघमारे, शहापूर-केकतीच्या ग्रा.पं.सदस्या दीक्षाताई कांबळे, विकी कांबळे, लक्ष्मण सत्रे, सिद्धांत उल्हारे, तन्वीर सय्यद, साहिल मोलवी आदि उपस्थित होते. दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी सरपंच श्री.मोरे, नाना उबाळे, अरुणाताई कांबळे आदिंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रातील विविध प्रसंग सांगून त्यांचे कार्य विषद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण जाधव यांनी केले तर आभार विकी कांबळे यांनी मानले.