देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: मा. पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्हयातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/ अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, संतोष लोढे, बिरप्पा करमल, ज्ञानेश्वर शिंदे, अतुल लोटके, संदीप दरंदले, सोमनाथ झांबरे, आकाश काळे, बाळसाहेब गुंजाळ, रविंद्र घुंगासे व उमाकांत गावडे यांचे पथक तयार करुन सोनई पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयावर कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथकास रवाना केले.
दिनांक 17/06/2025 रोजी पथकास गोपनीय माहिती मिळाली की, इसम फिरोज रशीद शेख, रा.कृष्णानगर, घोडेगाव, ता.नेवासा व पापा कुरेशी, रा.आळेफाटा, ता.जुन्नर, जि.पुणे यांनी मिळून फिरोज रशीद शेख याचे राहते घराजवळ घोडेगाव येथे गोवंश जातीचे जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने निदर्यतेने डांबुन ठेवले आहेत.पथकाने पंचासमक्ष मिळालेल्या माहितीवरून नमूद ठिकाणी छापा टाकला असता घटनाठिकाणी काही इसम दोन ट्रकमध्ये गोवंश जिवंत जनावरे भरताना दिसून आले व एका टेम्पोमध्ये जनावरे भरलेले असताना मिळून आले.पथकाने घटनाठिकाणावरून 1) निलेश रामकृष्ण शिंदे, वय 35, रा.उंबरगाव, ता.श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर 2) शाहरूख शमशुद्दीन शेख, वय 25, रा.जुनी पेठ, घोडेगाव, ता.नेवासा, जि.अहिल्यानगर 3) भारत भाऊसाहेब शहाराव, वय 36, रा.फत्तेपुर, ता.नेवासा, जि.अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले.
पथकाने पंचासमक्ष घटनाठिकाणावरून 27,00,000/- रू किं.त्यात अशोक लेलंड कंपनीचा ट्रक क्रमांक एमएच-23-एयु-5523, 15,00,000/- रू किं.त्यात टाटा कंपनीचा टेम्पो क्रमांक एमएच-16-सीडी-4877, 30,00,000/- रू किं.त्यात टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एमएच-16-एई-5484, 5,00,000/- रू किं.मारूती सुझुकी कंपनीची वॅगनर कार क्रमांक एमएच-05-बीएस-2898, 3,00,000/- रू किं.त्यात मारूती सुझुकी अल्टो कार क्रमांक एमएच-14-ईयु-1937, 22,90,000/- रू किं.त्यात 42 गोवंशीय लहान मोठी जनावरे असा एकुण 1,02,90,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपीकडे घटनाठिकाणच्या गोवंश जनावरांबाबत विचारपूस केली असता सदरची जनावरे 4) फिरोज रशीद शेख, रा.कृष्णानगर, घोडेगाव, ता.नेवासा (फरार) 2) पापा कुरेशी, रा.आळेफाटा, ता.जुन्नर, जि.पुणे जि.अहिल्यानगर पुर्ण नाव माहित नाही (फरार) यांचे मालकीची असून त्यांचे सांगणेवरून नमूद जनावरे ही कत्तल करण्यासाठी घेऊन जाणार असल्याची माहिती सांगीतली.ताब्यातील आरोपी मुद्देमालासह सोनई पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहेत.
पथकाने वर नमूद आरोपीविरूध्द सोनई पोलीस ठाणे गु.र.नं. 230/2025 महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम कलम 5 (अ), 5 (ब), 9 सह प्राण्यांना निदर्यतेने वागविणेचे कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर, मा. श्री. सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा