विकास मंडळ दूरुस्ती करतांना इतरमागास वर्गीय(ओबीसी) व भटके विमुक्त (vjnt) यांचेवर अन्याय =नारायण राऊत,एकनाथ व्यवहारे,आबासाहेब जगताप व मिनलताई काकडे सदिच्छा,बहुजन,शिक्षक संघ, साजिर महिला मंडळ आघाडी

☕☕☕☕☕☕☕☕☕
आहमदनगर (प्रतिनिधी) अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळावर गेल्या सहा वर्षांपासुन मा.रावसाहेब रोहोकले गुरुजी यांचे नेतृत्वाखालील गुरुमाऊली मंडळाची एक हाती सत्ता आहे.मागील सहा वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत विकास मंडळ या संस्थेसाठी 17 विश्वस्त निवडुन दिले होते.त्यात सर्वसाधारण 14 विश्वस्त,नगरपालिका/महानगरपालिका/भिंगारकॅन्टोंन्मेंट यापैकी 1 विश्वस्त,अनुसुचित जाती/जमाती पैकी एक विश्वस्त व महिला प्रतिनीधी पैकी एक विश्वस्त अशी रचना होती!
जुलै 2022 ची निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन काही महिन्यांपूर्वी सत्ताधारी विश्वस्त मंडळाने विकास मंडळ घटना दूरुस्तीचा घाट घातला होता.त्यात सर्वसाधारण जागा 14,नगरपालिका/महानगरपालिका/भिंगार कॅन्टोंनमेन्ट 1जागा,अनुसुचित जाती 1 जागा,अनुसुचित जमाती 1जागा,व महिला प्रतिनिधी 1 जागा असा बदल करण्यात येऊन,एकुण 18 विश्वस्त अशी रचना करण्यात आली. साधारणतः कोणत्याही सहकारी संस्थेतील विश्वस्तांची संख्या ही विषम ठेवतात. प्राथमिक शिक्षक बँकेप्रमाणेच 21विश्वस्त ठेऊन ओबीसी 1,भटके विमुक्त 1 व महिला प्रतिनिधी 2 जागा ठेवाव्यात म्हणजे 21 विश्वस्त होतील,असे सदिच्छा मंडळाने सुचवले होते,परंतु कधीही कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या विकास मंडळाच्या नेतृत्वाने कुणाचेही न ऐकता इतरमागासवर्गीय ( ओबीसी) व भटके विमुक्तांना एकही जागा दिली नाही,त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच ओबीसी व भटके विमुक्त प्राथमिक शिक्षकांमध्ये सत्ताधारी गुरुमाऊली मंडळाच्या विरोधात असंतोषाची लाट पसरली आहे.
येत्या 16 आॉक्टोबरला होणार्या निवडणुकीत गुरुमाऊली मंडळाला सर्वच सभासद धडा नक्कीच शिकवतील,सर्व सभासदांनी गुरुमाऊली मंडळाला याचा जाब विचारावा असे आवाहन *सदिच्छा,बहुजन,शिक्षक संघ,साजिर महीला मंडळआघाडीने* केले आहे!
=======================
☕☕☕☕☕☕☕☕☕
*सभासदांच ठरलयं! आमचं मत कपबशीला*
*विकास मंडळात ओबीसी व भटके विमुक्तांना टाळणार्या गुरुमाऊलीला हद्दपार करा*
☕ *कपबशीला मतदान करा*☕