खेडेगावातील शेतकरी, कष्टकरी, गरीब व गरजु लोकांना दृष्टिदान देणे पुंण्याचे कार्य:प्रा. किसनराव माने

शेवगाव प्रतिनिधी :-
अंधमुक्त शेवंगाव तालुका या संकल्पनेतुन विठ्ठल रुख्मिणी मंदिर, विद्यानगर शेवंगाव येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घेण्यात आलेल्या मोफत नेत्ररोग तपासणी व शस्रक्रिया शिबीरामध्ये तालुक्यातील 12 गावातील 56 रुग्णांनी नेत्र तपासणी करून घेतली. त्यामधील 21 नेत्र रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यासाठी निवड झाली असून त्यांच्यावर 4 जानेवारी 2023 रोजी पुणे येथील बुधराणी हॉस्पिटलमध्ये नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
रोटरी क्लब ऑफ शेवंगाव सिटी, रोटरी प्रतिष्ठाण शेवंगाव, विठ्ठल रुक्मिणी देवस्थान, विद्यानगर, बुधराणी हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर घेण्यात आले. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला विठ्ठल रुख्मिणी मंदिरात हे शिबीर घेण्यात येणार आहे.
शिबिरासाठी जेष्ठ समाजसेविका श्रीमती स्नेहलता लबडे, रोटरी क्लब ऑफ शेवंगाव सिटीचे मा. अध्यक्ष तथा अंधमुक्त व्हिलेज संकल्पना प्रोजेक्ट चेअरमन बाळासाहेब चौधरी, बुधराणी हॉस्पिटलच्या डॉ मीरा पटारे, विठ्ठल रुख्मिणी देवस्थानचे विस्वस्त दत्तात्रय काळे तसेच तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिराचे प्रास्ताविक बाळासाहेब चौधरी यांनी केले तर आभार दत्तात्रय काळे यांनी मानले.