महात्मा फुले वसाहतीतील सर्व समस्या आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने सोडविले जातील: सुरेश बनसोडे महात्मा फुले वसाहतीत आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचाराची बैठक सम्पन्न

अहिल्या नगर दि. 18 नोव्हेंबर (प्रतिनिधी ) अहिल्यानगर नगर शहर विधानसभा मतदार संघांचे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचाराची बैठक महात्मा फुले वसाहतीत जेष्ठ नेते सुनील शिंदे,विजयवडागळे, नाना पाटोळे यांच्या मार्गदर्शना खाली बैठक घेण्यात आली. बैठकीचे अध्यक्ष राष्ट्रवादी सामाजिक विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ बनसोडे होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले या भागातील नागरिकांच्या सर्व समस्या आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारने निश्चितच सोडविल्या जातील. येत्या 20 तारखेला घड्याळ चिन्हा समोरील बटन दाबून आमदार संग्राम जगताप यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी जेष्ठ नेते सुनील शिंदे, विजय वडागळे, नाना पाटोळे, अमित काळे, सुमेध गायकवाड, संजय ताकवाले,सिद्धार्थ आढाव, समीर भिंगारदिवे, स्तुती सरोदे, अंजली शिंदे, वर्षा सगळगिळे त्याच प्रमाणे या भागातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.