अहिल्यानगर दि. 14 नोव्हेंबर (प्रतिनिधी ) ” जगेल तर देशासाठी, मरेल तर देशासाठी ” या वाक्याचे जनक थोर क्रांतीकारक आद्यगुरु वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सिद्धार्थ नगर येथे आभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ बनसोडे, अंकुश मोहिते, आरपीआय आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र सचिव माजी नगर सेवक अजय साळवे, आरपीआयचे शहर जिल्हा अध्यक्ष किरण दाभाडे,पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे ) गटाचे जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड, ऍड. संदीप पाखरे आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा