आनंदधाम येथे कुंदनऋषीजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त धार्मिक परीक्षा बोर्डावर अभिषेक कळमकर यांचे आश्वासन: “आम्ही शांततेच्या मार्गाने, अहिंसेचा आदर्श ठेऊन, सेवा करत राहू”

अहिल्यानगर दि. 10 नोव्हेंबर : आनंदधाम येथे कुंदनऋषीजी महाराज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून धार्मिक परीक्षा बोर्डावर जाऊन दर्शन घेण्यात आले. या वेळी महाविकास आघाडीचे भगवान फुलसौंदर, विक्रम राठोड, संभाजी कदम यांसह अनेक कार्यकर्ते, अनुयायी, आणि स्थानिक नागरिकांची मोठी उपस्थिती होती. यावेळी नगर शहरातील सामाजिक व व्यापारी प्रश्नांवर चर्चा करत, अभिषेक कळमकर यांनी व्यापाऱ्यांना दिलासा देणारे आश्वासन दिले.
अभिषेक कळमकर म्हणाले की, “नगरमधील व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने, अहिंसेचा आदर्श ठेऊन, सेवा करत राहू.” त्यांनी पुढे असेही सांगितले की, “व्यापाऱ्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी आणि त्यांना येणाऱ्या कोणत्याही संकटात महाविकास आघाडी त्यांच्यासोबत ठामपणे उभी राहील.”
या प्रसंगी धार्मिकतेचे वातावरण निर्माण झाले होते, आणि सर्वांनी कुंदनऋषीजी महाराजांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना केली. उपस्थित कार्यकर्त्यांनीही शांती व सहकार्याच्या मार्गाने नगर शहरात विकास साधण्यासाठी योगदान देण्याची भावना व्यक्त केली.