अहिल्यानगर, दि.१०- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी श्रीगोंदा येथील
मतदान यंत्र जुळवणी केंद्राला भेट देत प्रक्रियेची पहाणी केली. मतदान यंत्र जुळवणीची प्रक्रिया अचूकपणे करण्याचे निर्देश त्यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती गौरी सावंत, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती क्षितिजा वाघमारे, परिविक्षाधिन तहसिलदार प्रवीण मुदगल, नायब तहसिलदार पंकज नेवसे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
निवडणुकीच्या अनुषंगाने श्रीगोंदा येथील केंद्रावर मतदान यंत्र जुळवणीची प्रक्रिया संपन्न झाली. या प्रक्रियेच्यावेळी जिल्हाधिकारी श्री. सालीमठ यांनी मॉकपोल, व्हीव्हीपॅटमधील स्लीपची पाहणी करत प्रक्रियेचा आढावाही घेतला.
या भेटीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कर्जत-जामखेड येथील मतदान यंत्र जुळवणी प्रक्रियेची पाहणी केली आणि पुढील प्रक्रियेबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शनही केले.
राहुरी विधानसभा मतदार संघात मतदान यंत्र जुळवणीची प्रक्रिया संपन्न
राहुरी विधानसभा मतदार संघात निवडणूक निरीक्षक श्रीमती रंजिता यांच्या उपस्थितीत मतदान यंत्र जुळवणीची प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्धरितीने संपन्न झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा