अहिल्यानगर दि. 5 नोव्हेंबर (प्रतिनिधी ) अहिल्यानगर नगर शहर विधानसभा मतदार संघांचे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थनार्थ आरपीआय आठवले गटाच्या वतीने विजयी निर्धार बैठकीचे आयोजन हॉटेल पंचवटी येथे करण्यात आले होते. यावेळी बैठकिचे अध्यक्ष आरपीआय चे जेष्ठ नेते विजयराव भांबळ होते.
यावेळी बोलतांना ते म्हणाले, आमदार संग्राम जगताप यांच्या अगोदर 25 वर्ष जे आमदार होते त्यावेळेस शहराची ओळख मोठे खेडे अशी होती. पण गेली 10 वर्षात आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या विकास कामामुळे ही ओळख पुसली आहे. ही जमेची बाजू आहे. अरुण काका जगताप यांनी नेहमीच आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम केले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन आमदार संग्राम जगताप हे काम करीत आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार जगताप यांना अनु. क्रमांक 4 व घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी आरपीआय चे जेष्ठ मार्गदर्शक प्रा. विलास साठे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नगर शहर व भिंगार शहर यांच्या वतीने या विजयी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाचे राष्ट्रीय नेते नामदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष भारत देशामध्ये कार्यरत आहे. पक्षाने मला काय दिले हा प्रश्न ज्यावेळेस पडतो त्यावेळेस मी रामदास आठवले साहेबांचा कार्यकर्ता ही ओळख मला पक्षाने दिली. हे महत्वाचे आहे. आपण पक्षाचे राष्ट्रीय नेते यांच्या आदेशानुसार 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना आपण सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते निवडून देणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी आरपीआय आठवले गटाचे उत्तर महा. सचिव माजी नगरसेवक अजय साळवे बोलतांना म्हणाले, रिपब्लिकन पक्ष व आंबेडकरी समाजाची नाळ नेहमीच जगताप कुटूंबीयांशी जोडली गेलेली आहे. टिळक रस्त्यावर आंबेडकर स्मारक व्हावे यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते त्यावेळेस उपोषणास बसलो होतो. त्यावेळेस समाजाच्या भावना लक्षात घेऊन त्यावेळेसचे नगरपालिकेचे नगर अध्यक्ष अरुण काका जगताप यांनी तातडीने ते काम पूर्ण केले. तसेच काम आमदार संग्राम जगताप करत आहेत. नगर व भिंगार शहररात त्यांनी अनेक बौध्द विहारे, व समाज मंदिरे उभारली आहेत. सामाजिक न्याय भवन बांधण्यासाठी व नगर शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा व्हावा आंबेडकरी चळवळीने 26 वर्ष संघर्ष केला. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या 10 वर्षात पाठपुरावा केला व आंबेडकरी जनतेचे स्वप्न साकार केले असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार संग्राम जगताप यांना भरपूर मतांनी निवडून देण्याचा मनोदय त्यांनी विजयी निर्धार बैठकीत केला. यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ बनसोडे हे बोलतांना म्हणाले शहरातील अनेक प्रश्न आमदार संग्राम जगताप यांनी मार्गी लावले असून पुढील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी तिसऱ्यांदा आमदार जगताप यांना आपल्याला निवडून आणून नगर शहरात अजून विकास कामे येणाऱ्या काळात करायची आहेत.
अनु. क्रमांक 4 व घड्याळ चिन्हा समोरील बटन दाबून आमदार जगताप यांना विजयी करण्याची विनंती त्यांनी यावेळी केली. या विजयी निर्धार बैठकीस, जेष्ठ मार्गदर्शक प्रा. विलास साठे सर, जेष्ठ नेते विजयराव भांबळ, राष्ट्रवादी सामाजिक विभाग जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ बनसोडे, प्रा. बी. एल. जाधव, चंद्रकांत भिंगारदिवे, रमेश भिंगारदिवे, अनुसया भाकरे, बबन भिंगारदिवे, किरण दाभाडे, देवेंद्र पाचारणे, विनायक संभागळे, विनोद साळवे, गणेश साळवे, सागर सोनवणे, अविनाश शिंदे, दया गजभिव, शेखर सरोदे, चंद्रकांत सरोदे,शंकर मेहेर, अलका भिंगारदिवे, वंदना भिंगारदिवे, मंगल भिंगारदिवे, विद्या सोनवणे, मंगल साळवे, अनुराधा साळवे, विठ्ठल शिरसाठ, गुलाब चाबुकस्वार, सुनील भालेराव, राहुल साळवे, ऋतिक साळवे, तेजस पाचारणे आदी कार्यकर्ते व शहरातील पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा