अहिल्यानगर दि. 6 नोव्हेंबर (प्रतिनिधी ) अहिल्यानगर नगर शहर विधानसभा मतदार संघाचे महायुती अजित पवार गटाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांची नगर विकास यात्रा प्रत्येक मतदार संघातील प्रत्येक प्रभागात गाजत आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप हे मैदानात उतरले आहेत. त्यांनी मुकुंदनगर भागातील गौरवनगर, फकीरवाडा आदी भागात विकास संवाद यात्रा काढत येथील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांचे परिसरातील महिलांनी ओक्षण केले, त्यांचे ठिकठिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. आमदार संग्राम जगताप तिसऱ्यांदा आमदार होतील असा विश्वास नागरिकांनी दिला.