अहिल्यानगर दि. 3 नोव्हेंबर (प्रतिनिधी ) माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांचे कुटुंबीय महायुतीचे अजित पवार गटाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या विजयासाठी मैदानात उत्तरल्याची माहिती मिळाली आहे.
रविवारी आमदार संग्राम जगताप यांनी गांधी कुटुंबीयांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी स्व. दिलीप गांधी यांच्या पत्नी श्रीमती सरोज गांधी यांचे आशीर्वाद घेतले. गांधी कुटुंबियांचा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे आमदार संग्राम जगताप यांच्या विजयाचा मार्ग अत्यन्त सुकर झाला असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
यावेळी भाजपचे नेते सुवेंद्र गांधी, दिप्ती गांधी,भाजपचे ओबीसी आघाडीचे प्रदेश उप अध्यक्ष किशोर डागवाले,अमित गटणे, सुमित कुलकर्णी आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा