अहिल्यानगर दि. 3 नोव्हेंबर (प्रतिनिधी ) अहिल्यानगर नगर शहर विधानसभा मतदार संघांचे महायुतीचे अजित पवार गटाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी बुरुडगाव रोड ते चाणक्य चौक या ठिकाणी नगर विकास यात्रा काढली होती. यावेळी ठिकठिकाणी त्यांच्यावर जेसीबी मधून फुलांची उधळण करत, व महिलांनी त्यांचे औक्षण करत स्वागत केले, यावेळी महानगर पालिकेचे माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते,नागरिक मोठयासंख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांचा ठिकठिकाणी तरुणांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार केला. नगर विकास यात्रेला शहरातील सर्वच प्रभागात नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.