अहिल्यानगर दि. 24 ऑक्टोबर (प्रतिनिधी )
मा.श्री.राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना आगामी विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये स्थागुशा पथक जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे या बाबत माहिती घेताना दिनांक 24/10/2024 रोजी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, एक इसम विनापरवाना गावठी कट्टा बाळगत असून सध्या तो भिंगार ते अहिल्यानगर रोडवर, भिंगार नाला येथे थांबलेला असलेबाबत माहिती मिळाली. पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, रोहित मिसाळ, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे व मेघराज कोल्हे नेम. तपास पथक, अहमदनगर अशांचे पथक तयार करून संशयीताची माहिती घेवुन तो मिळुन आल्यास त्यास ताब्यात घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
तपास पथकाने दिनांक 24/10/2024 रोजी भिंगार ते अहिल्यानगर रोडवर, भिंगार नाला येथून संशयीत इसमास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीतास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव अजय अरूण साळवे, वय 41, रा.सदर बाजार, भिंगार, अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत 30,000/- रुपये किंमतीचा एक गावठी बनावटीचे पिस्टल व 500/- रुपये किंमतीचे 1 काडतुस असा एकुण 30,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
आरोपी अजय अरूण साळवे, वय 41, रा.सदर बाजार, भिंगार, अहिल्यानगर याचेविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गु.र.नं. 748/2024 आर्म ॲक्ट कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयांचा पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर व श्री. अमोल भारती साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा