गुन्हेगारी

नगर तालुक्यातील अरणगाव येथील सराईत गुन्हेगार एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द मा. जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर याचे आदेश…

अहिल्यानगर दि. 18 ऑक्टोबर (प्रतिनिधी ) प्रस्तृत बातमीतील हकीगत अशी की, नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अरणगाव येथे राहणारा कृष्णा बाबासाहेब गुंड, वय 27 वर्षे याने कोतवाली, तोफखाना व नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत व परिसारात त्याचे साथीदारांसह जबरी चोरी करणे, चोरी करणे, घातक हत्यांरासह खुनाचा प्रयत्न करणे असे गंभीर स्वरुपाचे शरीराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गुन्हे करुन तेथील राहणारे सर्व सामान्य लोकांवर दहशत निर्माण केलेली होती. त्यामुळे कोतवाली, तोफखाना व नगर तालुका पोलीस स्टेशन तसेच अहिल्यानगर शहराचे आजुबाजुच्या परिसरात सार्वजनीक सुव्यवस्थेस बाधीत झाली होती. सराईत गुन्हेगार कृष्णा बाबासाहेब गुंड, वय 27 वर्षे याचे समाजविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रचलीत कायदयान्वये करण्यांत आलेल्या प्रतिबंधक कारवाया अपुऱ्या व कुचकामी ठरत होत्या. त्याचे गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध होण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री. प्रल्हाद गिते, नगर तालुका पोलीस स्टेशन यांनी एम.पी.डी.ए. कायदयान्वये प्रस्ताव तयार करुन श्री. संपतराव भोसले, उप विभागीय पोलीस अधिकारी, अहिल्यानगर उप विभाग यांचे व श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या मार्फत मा.श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांना सादर केला होता.
सदर प्रस्तावाची मा.श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी बारकाईने पडताळणी करुन सदरचा प्रस्ताव हा शिफारस अहवालासह मा.जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर यांना सादर केला होता.
सराईत गुन्हेगार कृष्णा बाबासाहेब गुंड, वय 27 वर्षे याचे विरुध्द खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
1. नगर तालुका गु.र.नं. 244/2019 कलम भादवी क.394,34प्रमाणे
2 तोफखाना गु.र.नं. 4594/2020 भादवीक 379,34 प्रमाणे
3 कोतवाली गु.र.नं. 63/2022 भादवीक 379,34 प्रमाणे
4 कोतवाली गु.र.नं. 840/2023 भादवीक 307,323,34 प्रमाणे.
5 नगर तालुका गु.र.नं. 416 /2024 भादवी क 307,336, 323,504,34 प्रमाणे

नमुद प्रस्तावांची व सोबतच्या कागदपत्रांची मा.श्री. सिध्दाराम सालीमठ, जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर यांनी पडताळणी करुन अहिल्यानगर जिल्हयातील सार्वजनीक सुव्यवस्था अबादित राहावी याकरीता सराईत गुन्हेगार कृष्णा बाबासाहेब गुंड, वय 27 वर्षे, रा.अरणगाव,ता.जि.अहिल्यानगर यास स्थानबध्द करणे बाबतचे आदेश काढले असुन त्याप्रमाणे पोलीसांनी त्यास ताब्यात घेवुन नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे स्थानबध्द केले आहे.
सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.दिनेश आहेर, स.फौ. रविंद्र पांडे, पोहेकॉ सुरेश माळी, बापुसाहेब फोलाणे,आण्णा पवार, पोकॉ जालींदर माने, चापोकॉ/अरुण मोरे तसेच नगर तालुका पो.स्टे.चे पोकॉ संभाजी बोरुडे यांनी केली आहे.
सध्या आदर्श आचारसंहिता लागु असुन दरम्यानच्या कालावधीमध्ये अहिल्यानगर जिल्हयातील सराईत गुन्हेगार तसेच संघटीतपणे गुन्हे करणा-या टोळीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत असुन सराईत गुन्हेगारांनी निवडणुक कालावधीत गुन्हे करुन आचार संहिता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा बिमोड करण्यासाठी त्यांचेवर प्रचलित कायदयान्वये कठोर कारवाई करण्याचे संकेत मा.श्री. सिध्दाराम सालीमठ, जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर व मा.श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी दिलेले आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे