वेतनपथक अधिक्षक , यांना जिल्हयातील विविध प्रश्नासंदर्भात सविस्तर चर्चा करून निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी) वेतनपथक अधिक्षक यांना जिल्हयातील विविध प्रश्नासंदर्भात सविस्तर चर्चा करून निवेदन देताना शिक्षक परिषदेचे नेते व माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे , दत्तात्रय दरेकर , बापूराव इंगवले , दुधाने नंदा ,सुनंदा शिरसाठ , गवते उल्का , राजू नरोडे , जगदीश आव्हाड , संतोष उरमुडे , राजेंद्र शिंदे , केशव गुंजाळ , हुलुळे आदिनाथ , रामभाऊ पोटे , उमाप कैलास , संदीप सोनवणे , इटेवाड राजकुमार व इतर शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.
निवेदनामध्ये जानेवारी २०२२ चे वेतन मार्चपासूनची सर्व कर्मचार्यांची वैद्यकिय बिले , पुरवणी बीले , भविष्यनिर्वाह निधीची प्रकरणे , शालार्थ आय डी चे प्रकरणे ,२० व ४० टक्के अनुदान मिळालेल्या हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे वेतन , आदी मागण्यांची सविस्तर चर्चा करून निवेदन दिले . सर्व प्रश्न लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करून मार्गी लावण्याचे वेतनपथक अधिक्षक स्वाती हवेले यांनी आश्वासन दिले.