तरुण पिढीला वाचनीय बनवण्याची गरज ॲड. बाळकृष्ण चोरमुंगे
सात्रळ महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

राहुरी / प्रतिनिधी – नव समाज माध्यमांशी जोडल्या गेलेल्या तरुणांनी हातात पुस्तके घेऊन वाचणे आवश्यक आहे. चांगल्या वाचनामुळे व्यक्तिमत्व विकास होतो. जीवनात आनंद निर्माण होऊन यशोगाथा घडविता येते. तरुण पिढीला वाचनीय बनवण्याची गरज आता शिक्षक आणि पालक यांच्यावर आली असल्याचे मत प्रतिपादन सात्रळ महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ॲड. बाळकृष्ण चोरमुंगे यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या तालुक्यातील सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागाचे ‘अक्षर’ मराठी वाड्.मय मंडळ, सांस्कृतिक विभाग व उत्सव समिती आयोजित कवी कुसुमाग्रज यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमांतर्गत ‘लेखक आपल्या भेटीला’, ग्रंथप्रदर्शन व विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणून महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त लेखक प्रा. डॉ. अनंत नानाजी केदारे यांनी ‘माझे लेखन आणि मी’ या विषयाच्या अनुषंगाने आपला जीवन प्रवास उलगडून दाखविला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. ॲड. बाळकृष्ण चोरमुंगे होते. यावेळी पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे व्हाईस चेअरमन कडू पाटील, कारभारी ताठे सुभाष अंत्रे , ॲड. अप्पासाहेब दिघे , जयवंत जोर्वेकर, नंदू दिघे , दिलीप डुक्रे, वसंतराव डुक्रे पाटील, परसराम साबळे पाटील, प्रकाश ताठे, अतुल ताठे, संजय नागरे , कैलास डुक्रे, . विपीन ताठे , उपप्राचार्य प्रो. डॉ. सोमनाथ घोलप , उपप्राचार्य प्रा. दीपक घोलप, उपप्राचार्य प्रा. दिनकर घाणे, उपप्राचार्य प्रा. डॉ. भाऊसाहेब नवले, डॉ. गंगाराम वडीतके उपस्थित होते.
डॉ. केदारे म्हणाले, माझ्या जगण्याचीच कविता झाली. माझा वेदनामय सत्य सभोवताल मी शब्दातून मांडला. अनुभव समृद्ध असतील तर लेखणीही समृद्ध होते. याप्रसंगी ॲड. चोरमुंगे पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत धाडसाने बोलल्यामुळे त्यांनी सात्रळ महाविद्यालयाचे नाव उंचावलेले आहे. हे उपक्रमशील शैक्षणिक संकुल आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता सर्व शिक्षक मनापासून प्रयत्न करताना दिसतात, त्याबद्दल आम्हाला समाधान वाटते. प्रास्ताविक कार्यक्रमाचे समन्वयक व मराठी विभागप्रमुख डॉ. नवनाथ शिंदे यांनी केले.
याप्रसंगी ऋत्विका अविनाश ताठे, सुजित बाळकृष्ण ताठे, शादाब राजू इनामदार, वैष्णवी बेलकर, ऋषिकेश अनाप, वैष्णवी शंकर होले, जैनाब मनसुरी सिराज, गायत्री विश्वनाथ गावडे, तेजस्विनी महादेव हारदे आदी विद्यार्थी – विद्यार्थिनींचा तसेच प्राध्यापकांचाही उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.
विभागीय ग्रंथालयाने आयोजित केलेल्या ग्रंथ प्रदर्शनास वाचकांनी उस्फूर्तपणे भेट दिली. आभार उपप्राचार्य प्रा. डॉ. भाऊसाहेब नवले यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. लतिका पंडुरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. आदिनाथ दरंदले, राजू कदम रमेश डोखे, संजय तुपे, मज्जिद शेख यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.