नराधम भाच्याने मामीवर व मामीच्या मुलीवर केला अत्याचार!

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यातील वडगावपान गावात नराधम भाच्याने मामीवर व तिच्या अल्पयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मामी भाचा या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे संगमनेर तालुकाच नव्हे तर अहमदनगर जिल्हा हादरला आहे.
चक्क 32 वर्षीय मामीवर आणि मामीच्या अल्पवयीन मुलीवर भाच्याने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
ही घटना बुधवार दि. 27 एप्रिल 2022 व वर्षभरात वेळोवेळी झाल्याचे पीडितेच्या सांगण्यावरून लक्षात आले आहे. याप्रकरणी खुद्द मामीने आपल्या भाच्याच्या विरोधात 2 मे रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या नराधम भाच्यास संगमनेर तालुका पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील वडगावपान परिसरात एक कुटुंब राहत होते. त्यांना एक मुलगी होती. त्याच परिसरात पिडीत महिलेची नणंद असल्याने त्यांचे नेहमी घरी जाणे येणे होते. पिडीत महिलेचा भाचा देखील वेळोवेळी घरी येत जात होता. पण, हळूहळू त्याची नियत मामीवर फिरली.
भाचा एकदिवस मामीच्या घरी आला व त्याने तिच्याकडे शरिर सुखाची मागणी केली. व धमकी देत तो म्हणाला की, तू माझी इच्छा पुरी केली नाहीतर मी तुझ्या मुलीला व नवऱ्याला ठार मारील. त्यामुळे त्याच्या दबावाला आणि धमक्यांना मामी बळी पडली. नराधम भाच्याने या धमकीचा फायदा उचलत मामीच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी बलात्कार केला.