राजकिय

विधानसभा आचारसंहितेपुर्वी अहमदनगरचे अहिल्यानगर नामकरण होणार – आमदार प्रा. राम शिंदे

जामखेड (प्रतिनिधी रोहित राजगुरू) : राज्याच्या विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेपुर्वी अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा राम शिंदे यांनी चोंडी येथे बोलताना केले.
जामखेड तालुक्यातील चोंडी येथे आज 13 ऑगस्ट रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 228 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार प्रा राम शिंदे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब डांगे हे होते.
यावेळी बोलताना आमदार प्रा.राम शिंदे म्हणाले की, औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामकरण करायला ४० वर्षे लागले पण पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जन्मभूमीमध्ये तीनशेव्या जयंतीला सामोरे जात असताना आपण मागणी केली की या जिल्ह्यात अहिल्यादेवींची जन्मभूमी आहे. त्यामुळे जिल्ह्याचं नामकरण अहिल्यानगर करण्यात यावं आणि अवघ्या 40 मिनिटांत नामकरणाची घोषणा झाली. दुसऱ्या जयंतीला त्याची कार्यवाही करून मुख्यमंत्री इथे हजर राहिले. प्रस्ताव दिल्लीला गेला. पुण्यतिथीच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो की विधानसभा निवडणुकीच्या अचारसंहितेपुर्वी अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर होणार म्हणजे होणार असे म्हणताच उपस्थित धनगर समाज बांधवांनी एकच जल्लोष केला.
यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार रामहरी रूपनवर, धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ॲड चिमणभाऊ डांगे,श्रीराम पुंडे , बबनराव रानगे, डॉ अलकाताई गोडे, सुभाष सोनवने, सुनिल वाघ, संगीता ख़ोत, गड़देमहाराज, सह राज्यातील धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे