नगर दि.17( प्रतिनिधी)
बा विठ्ठला कृपा कर आणि राज्य दुष्काळमुक्त होवू दे आशी प्रार्थना करीत डॉ सुजय विखे पाटील पांडूरंगाच्या चरणी नतमस्तक झाले.पंढरपूर येथे जिल्ह्यातून गेलेल्या दिंड्या मध्ये सहभाग घेवून त्यांनी वारकर्या समवेत विठूनामाचा जयघोष केला.
डॉ सुजय विखे पाटील यांनी आषाढी वारीच्या निमिताने पंढरपूर येथे पांडूरंगाचे दर्शन घेतले.तत्पुर्वी त्यांनी नगरसह राज्यातून आलेल्या दिंड्यामध्ये पायी चालून भक्तीमय वातावरणाचा आनंद घेतला
अहील्यानगर जिल्ह्यातून पंढरपूर मध्ये आलेल्या सर्व वारकर्याशी संवाद साधला.येथील सोयी सुविधांबाबत माहीती घेतली.
विखे पाटील परीवारच्या वतीने पंढरपूर मध्ये विकसित करण्यात आलेल्या आश्रमात मोठ्या संख्येने वारकरी उतरले आहेत.तिथेही डाॅ.विखे पाटील यांनी जिल्ह्यातील वारकर्याच्या भेटी घेतल्या.
राज्यात चांगला पाऊस होवू दे आणि राज्यातील दुष्काळ हटू दे आशी प्रार्थना आपण पांडूरंगाच्या चरणी केली असून आषाढ वारीच्या अध्यात्मिक सांस्कृतिक सोहळ्याच्या त्यानी सर्वाना शुभेच्छा दिल्या.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा