कौतुकास्पद

नगर जिल्ह्यातील भूमीपुत्राना मेगा ब्लड डोनेशन कॅम्पचा उपयोग होत आहे: आमदार संग्राम जगताप आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी केले रक्तदान!

अहमदनगर दि. 16 जुलै (प्रतिनिधी ) नगर जिल्ह्यातील भूमीपुत्राना मेगा ब्लड डोनेशन कॅम्प अर्थात महारक्तदान शिबिराचा उपयोग होत असल्याचे प्रतिपादन नगर शहराचे कार्यसम्राट आमदार संग्राम भय्या जगताप यांनी केले.शहरातील नंदनवन लॉन्स येथे मंगळवार दि. 16 जुलै रोजी अहमदनगर मोबाईल रिटेल्स असोसिएशन, आय लव्ह नगर सोशल फाउंडेशन , संग्रामभय्या जगताप सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेगा ब्लड डोनेशन कॅम्प 2024 या महारक्तदान शिबिराच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात महाराष्ट्र मोबाईल रिटेल असोसिएशनचे राज्य अध्यक्ष अजित शेठ जगताप यांनी मेगा ब्लड डोनेशन कॅम्प ची भूमिका विशद केली.
यावेळी आई लव्ह नगर सोशल फाउंडेशनचे संस्थापक उद्योजक नरेंदशेठ फिरोदिया, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे,महानगर पालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, माजी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक अविनाश तात्या घुले, नगरसेवक संजय चोपडा, नगरसेवक प्रकाश भागानगरे, प्रा. माणिक विधाते, सतीश लोढा, माजी नगरसेवक विजय गव्हाळे, माजी नगरसेवक दगडूमामा पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक म्हणून बोलतांना आमदार संग्राम जगताप म्हणाले, 2022 अशाच मोठया ब्लड कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते, या कॅम्पमध्ये नगर जिल्ह्यातील सगळ्यात जास्त रक्त संकलन करण्याचा विक्रम झाला होता. 2022 साली रक्त संकलन करण्यात 1500 चा आकडा गाठला होता. रक्तदान किती होते. त्यापेक्षा कार्यक्रम घेण्याचा विचार, त्यामागची समाज उपयोगी भावना खूप महत्वाची आहे. अहमदनगर मोबाईल रिटेल्स असोसिएशनची चांगल्या विचारधारेने लोकांना मदत करण्याची भावना खूप सकारात्मक आहे. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी रक्तदान केले तर आम्हालाही रक्तदान करण्याचा उत्साह निर्माण होऊन आम्ही देखील रक्तदान करू असा आशावाद व्यक्त केला. सकाळी 7 वाजल्यापासून सुरु झालेल्या या शिबिरास नगर शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बेडेकर यांनी केले तर, आभार प्रदर्शन अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशन चे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे