राजकिय

नुकसान झालेल्या पीकांबाबत शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेणार पालकमंत्री – राधाकृष्ण विखे- पाटील

अहमदनगर दि २५(प्रतिनिधी)
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील पिकांबाबत शासन स्तरावर शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेऊन, त्यांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे,प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. जामखेड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून सिताराम गड खर्डा येथे आयोजित आढाव बैठकीत ते बोलत होते.
यावेळी आमदार. प्रा.राम शिंदे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, उपस्थित होते.
या दौऱ्यात खर्डा परिसरासह, मोहरी, तेलंगशी, जायभायवाडी भागात सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे बांधावर जाऊन शेतातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिले.
पालकमंत्री श्री विखे- पाटील म्हणाले की,ऑनलाईन पीक विम्यासाठी नोंदणी करताना अडचणी असल्याने ऑफलाईन पंचनामे करण्याचे सूचना संबंधितांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांचा खाजगी विमा कंपन्यावर रोष आहे, शेतकऱ्यांकडून पिक विमा साठी काही रक्कम भारत सरकार व राज्य सरकार भागीदारी करून भरत असते,त्या पटीत शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. ६५ मिली मीटर पावसाचे अट असल्याने शेतकऱ्यांना नुकसानीचा फायदा मिळत नाही, त्या विषयावर त्या नियमात काय त्रुटी राहिल्या आहेत त्या शिथिल करण्याचा प्रयत्न चालू आहे. खाजगी विमा कंपनीचे ७२ तासाच्या आत विमा कंपनीला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कळवणे बंधनकारक ही आठ शिथिल करण्याची गरज आहे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.हा निर्णय बदलण्याचा प्रयत्न कृषी मंत्र्यांशी चर्चा करून रद्द करण्यासाठी प्रयत्न करू. सरकार शेतकऱ्यांचे आहे,पैसा शेतकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांना जाचक अटी घालून चालणार नाही त्यासाठी विमा कंपन्यांना शेतकरी हिताच्या अटी घालून शेतकऱ्यांना नुकसान ग्रस्त मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार. नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहावे, नुकसानग्रस्त शेतकरी शासकीय मदती पासून वंचित राहता कामा नये अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांचा वीज प्रश्न लवकरच सुटून, मागेल त्याला शेततळे देण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
बैठकीमध्ये माजी मंत्री आ प्रा राम शिंदे यांनी परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना म्हटले की, या नुकसान यामुळे शेतकरी फार अडचणीत आला आहे. नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनात द्याव्यात, लवकरच पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
शासनातर्फे गोरगरिबांना देण्यात येणारा आनंदाचा शिधा,पालकमंत्री श्री विखे -पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी अजित थोरबोले, जामखेड तहसीलदार योगेश चंद्रे, कर्जत तहसीलदार नानासाहेब आगळे, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप,जिल्हा परिषद पशुसंवर्धन उपायुक्त डॉ केशव तुंबारे,तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ संजय राठोड, पशुधन विकास अधिकारी डॉ कुलदीप चौरे, सहाय्यक गटविकास अधिकारी दयानंद पवार, आदी अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे