साकेगाव येथे वंचित बहूजन आघाड़ीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण यांची घोगंडी बैठक व शाखा उद्घाटन समारोह कार्यक्रम संपन्न

पाथर्डी दि.४ जून (प्रतिनिधी) साकेगाव ता पाथर्डी येथील सर्व समाज बांधव, ग्रामस्थ तसेच वंचित बहूजन आघाड़ीचे कार्यकर्ते यांनी केला प्रथम ढोल ताशाच्यां गजरात व फटाके वाजवून मा प्रा किसन चव्हाणसर व वंचित बहूजन आघाड़ीचे शेवगांव,पाथर्डी तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी यांचे स्वागत करून भव्य मिरवणुक काढून सर्व महामानवांच्या जयजयकारांच्या घोषणा देत शाखा उद्घाटन व घोंगडी बैठकीस सुरवात झाली. या बैठकीत वंचित बहूजन आघाड़ीचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के,पाथर्डी तालुका अध्यक्ष भोरू म्हस्के, शेवगांव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई मा प्रा किसन चव्हाणसर यांची मार्गदर्शन पर भाषणे झाली या शाखा उद्घाटन व घोंगडी बैठकीस सचिन गोरे, सुधाकर बळीद,सतिश सातपुते, प्रशांत गोरे,अमोल साठे, कृष्णा भागवत,गणेश घुगरे, विश्वास बळीद,श्रीपद बळीद, विनोद गरुड,सावळेराम घुगरे,परशूराम वीर,अक्षय बळीद, शंकर पंडीत रामदास सातपुते चंद्रकांत देवढे, योगेश पंडित, विकास औटी,प्रविण धुमाळ, योगेश वैद्य,दिगंबर घुगरे,जालू आमले,सारंगधर सातपुते, कामगार संघटना अध्यक्ष रमेश खरात, अशोक बिडे,किसन पवार पाटील, लक्ष्मण मोरे, शेख राजूभाई, रविन्द्र सर्जे, महादेव जगधने राक्षी शाखा अध्यक्ष शेख अर्शद, पाडळीचे आदर्श शेतकरी नंदु कांबळे, ब्रदर विजय कांबळे, एल आय सी आफिसर लाजरस कांबळे व ईतर सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहूजन आघाड़ीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थितीत होते तसेच महीला भगीणी,पाथर्डी तालुका महीला उपाध्यक्ष सौ रोहीणी ठोंबे,अनिता कांबळे,कोमल बळीद,संगिता कटारुवरे,शशीकला बळीद, मनिषा आरख,राणी बळीद,रिबेका बळीद,सुशीला चव्हाण,प्रतिभा चव्हाण, रंजना पवार,विमल जाधव,मनिषा सचिन, सुरेखा चव्हाण, जनाबाई पवार, पार्वती चव्हाण, शांताबाई राठोड़,संगीता चव्हाण,पेमाबाई चव्हाण व ईतर महीला भगीणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या प्रसंगी अरविंद सोनटक्के म्हणाले की मा प्रा किसन चव्हाणसर यांच्या घोगंडी बैठकीमुळे शेवगांव पाथर्डी तालुक्यातील शेतकरी, युवक कार्यकर्ते,महीला भगीणी यांना आपले हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे आता सर्व समाज जागृत झाला आहे *त्याच तिकीटावर तोच खेळ आता संपवावा लागेल* आपले अनमोल मत वंचित बहूजन आघाडीच्याच उमेद्वाराला द्या येणार्या शेवगांव पाथर्डी तालुक्यातील सर्व निवडणूका वंचित बहूजन आघाडी स्वबळावर लढणार आहे या अगोदर जनतेला पर्याय नव्हता *डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वंचित बहूजन आघाड़ीचे सर्वे सर्व आदरनिय प्रकाश आंबेडकर* यांनी आता वंचित बहूजन आघाडीच्या माध्यमातून चांगला पर्याय दिला आहे तसेच मा भोरु म्हस्के म्हणाले की जर वंचित बहूजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पदाधिकार्यांना जाणीव पुर्वक त्रास देण्याचा कोणीही प्रयत्न करू नये अन्यथा त्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल या कार्यक्रम दरम्यान साकेगाव येथील नागरिक व महीलांनी आपल्या समस्या बाबत पाढाच वाचला या कार्यक्रमाचे सुत्र संचालन वंचित बहूजन आघाड़ीचे पाथर्डी तालुका महासचिव संजय कांबळे यांनी केले तर सर्व उपस्थितीतांचे आभार युवा कार्यकर्ते नितीन बळीद यांनी व्यक्त केले.
*घोगंडी बैठकीचे औचित्य साधून मा प्रा किसन चव्हाणसर यांचा वाढदिवस मौजे साकेगाव येथील सर्व स्वाभिमानी ग्रामस्थ,सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.