तोफखाना पोलिसांनी आवळल्या २३ मोटारसायकल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या!

अहमदनगर दि. ४ जून (प्रतिनीधी):- तोफखाना पोलीसांना २३ मोटारसायकल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे.
शहरातील दुचाकी चोरणारा चोरट्यांकडून तब्बल २३ दुचाकी हस्तगत करण्याची मोठी कामगीरी तोफखाना पोलिसांनी केली आहे.विविध कंपनीच्या दुचाकी असून त्यांची किंमत१५ लाख ९० हजार रूपये आहे.किसन उर्फ कृष्णा पोपट सापते (वय २६,रा.खकाळवाडी ता.आष्टी जि. बीड) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदरील कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शखाली तोफखाना पोनि/ज्योती गडकरी यांना दिलेल्या सूचनेनुसार तोफखाना गुन्हे तपास पथकामधील पोउपनिरी/समाधान सोळंके, पोहेकॉ/दत्तात्रय जपे,पोहेकॉ/सुनिल शिरसाठ,पोना/अविनाश वाकचौरे,पोना/वसिम पठाण,पोना/अहमद इनामदार,पोना शैलेश गोमसाळे,पोकॉ/सतिष त्रिभुवन,पोकॉ/शिरष तरटे, पोकॉ/सचिन जगताप,पोकॉ/धिरज खंडागळे,पोकॉ/चेतन मोहिते,पोकाॅ/गौतम सातपुते,पोकाॅ/अतुल कोतकर,पोकाॅ प्रशांत राठोड आदिंच्या पथकाने केली आहे.