गुन्हेगारी

पाच वर्षापासून खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी कर्जत पोलिसांच्या ताब्यात

कर्जत( प्रतिनिधी) : दि ४ जून
मोढळे वस्ती (राशीन) खुनाच्या गुन्ह्यातील पाच वर्षांपासून फरार असणाऱ्या आरोपीस कर्जत पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळवले.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, राशीन(मोढळे वस्ती) येथे जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात पैसे लावण्याच्या कारणावरून तलवारीने, कुर्‍हाडीने, काठयाने मारहाण करून झालेल्या वादात भाऊ आप्पा मोढळे हे गंभीर जखमी झाले होते तर दगडू महादेव मोढळे हे मयत झाले होते. याबाबत फिर्यादी अशोक दगडू मोढळे यांनी राशीन पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार कर्जत पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ६३/२०१६ भादवि कलम ३०२, ३०७, ३२४, १४३, १४७, १४८,१४९, ५०४, ५०६ सह आर्म ॲक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हातील आरोपी विजय लक्ष्मण मोढळे (वय:२९,रा. मोढळे वस्ती) हा घटना घडल्यापासून फरार होता. तब्बल पाच वर्षांनंतर तो खेड(ता.कर्जत) परिसरात आला असल्याची गुप्त माहिती कर्जत पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ कर्जत पोलिसांचे पथक खेड भागात रवाना केले. यावेळी सदर गुन्ह्यातील आरोपी विजय मोढळे हा कर्जत पोलिसांना आढळून आला त्यास ताब्यात घेत अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यादव यांनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सपोनि सतीश गावित, सफौ तुळशीदास सातपुते, अण्णासाहेब चव्हाण, संभाजी वाबळे, भाऊसाहेब काळे, अर्जुन पोकळे, देविदास पळसे, संपत शिंदे यांनी पार पाडली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे