लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले – किरण काळे जयंती निमित्त शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने अभिवादन

अहमदनगर (प्रतिनिधी) आण्णाभाऊ साठे हे लोकशाहीर होते. त्यांच्या लेखणीला सामाजिक धार होती. साहित्यरत्न असणाऱ्या अण्णाभाऊंनी समाजातील दलित बांधव तसेच कामगारांच्या वेदनांना वाचा फोडण्याचे काम केले. आपल्या लेखणीतून त्यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांनी केले आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांच्या लालटकी येथील पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी लहुजी वस्ताद यांच्या पुतळ्याला देखील हार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी काळे बोलत होते.
यावेळी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अनिस चुडीवाला, ब्लॉक काँग्रेसचे हनिफ मोहम्मद जहागीरदार, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, राणीताई पंडित, मागासवर्गीय काँग्रेस विभागाचे संजय भिंगारदिवे, भिंगार काँग्रेसचे शहराध्यक्ष सागर भिंगारदिवे, प्रमोद डांगे, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड, विनोदभाऊ दिवटे, मागासवर्गीय महिला काँग्रेसच्या ज्योतीताई साठे, निलेशदादा चक्रनारायण, अभिनय गायकवाड, इंजिनीयर सुजित क्षेत्रे, उमेशराव साठे, राहुल गांधी विचार मंचचे शहराध्यक्ष सागर ईरमल, मनोज नेटके, आकाश दाते, सागर वाकचौरे, अविनाश ठोकळ, बिभीषण चव्हाण, प्रशांत जाधव, गौरव घोरपडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किरण काळे यावेळी म्हणाले की, स्व.अण्णाभाऊ यांनी समाज सुधारणेसाठी त्याचबरोबर दलित चळवळ व कामगार चळवळीसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. फक्त दीड दिवस शाळा शिकलेल्या अण्णाभाऊंच्या लिखाणा मध्ये तत्कालीन समाजस्थितीचे प्रतिबिंब होते. आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अनेक चुकीच्या गोष्टींना वाचा फोडली. अनेक विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या असून अण्णाभाऊंनी तब्बल पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या ही अनन्यसाधारण प्रतिभा आहे.
काळे पुढे म्हणाले की, अण्णाभाऊंनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास अनुसरून दलित चळवळीसाठी काम केले. स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये जातीयवादामुळे अण्णाभाऊ साठे यांना दुर्दैवाने शिक्षणापासून वंचित राहावे लागले होते. अण्णाभाऊंनी त्यांच्या लिखाणातून मागासवर्गीय समाजा बरोबरच इतर समाजांना देखील विचारांची शिदोरी दिली. अण्णाभाऊंनी कला पथकाच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृतीचे काम केले. आजची तरुण पिढी ही अण्णाभाऊंच्या विचारांवर चालत आहे.