राजकिय

विधानसभा निवडणुकीत दुसरे आमदार निवडून आले, परंतु तुम्हाला बोल बच्चन शिवाय काहीच मिळाले नाही असा टोला दिला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जामखेड दि. 10 मे (प्रतिनिधी रोहित राजगुरू ) अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दि ९ मे रोजी दुपारी चार वाजता जामखेड येथील बाजारतळ या ठिकाणी भव्य आशी सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की,डॉ सुजय विखेंना मतदान केले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान होईल.विकासापासून कोणी रोखू शकत नाही.आमदार प्रा.राम शिंदे यांनी पालकमंत्री, मंत्री, आमदार असताना कर्जत जामखेड येथे मोठ्या प्रमाणावर निधी आणून विकासाची कामे केली होती. परंतु मागच्या विधानसभा निवडणुकीत दुसरे आमदार निवडून आले.पंरतु तुम्हाला बोलबच्चन शिवाय काहीच मिळाले नाही.असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता लगावला. राज्यात आपले सरकार आले आमदार प्रा राम शिंदे आमदार झाले. पुन्हा कर्जत जामखेड मध्ये एम आय डी सी, पाणी पुरवठा योजना , रस्त्याच्या योजना आणली.” रामभाऊंनी ज्या ज्या मागण्या केल्या आहेत. “रामभाऊ चिंता करू नका,मी तुमचा बेरर चेक आहे.त्याच्यावर किंमत टाकायची,सही मी केलेली आहे.जेवढ्या योजना मागाल,त्या निश्चितच मिळतील.
यावेळी उमेदवार खा. सुजय विखे पाटील, आ. प्रा राम शिंदे, आ. सुरेश धस, आ. भिमराव धोंडे, चित्राताई वाघ, उमेश पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष अजय काशिद,शिवसेना तालुकाप्रमुख. प्रा कैलास माने सर, मनसे तालुका अध्यक्ष प्रदिप टापरे, राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष महेश निमोणकर,सभापती पै. शरद कार्ले, माजी सभापती डॉ भगवान मुरुमकर, सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन सर गायवळ, प्रविण चोरडिया, मनोज कुलकर्णी, रवि सुरवसे, सोमनाथ पाचारणे,पोपट राळेभात, नगरसेवक अमित चिंतामणी, बिभीषण धनवडे,सलिम बागवान, बाजीराव गोपाळघरे,शहराध्यक्ष पवन राळेभात, सरपंच संजीवनीताई लोंढे पाटील, आर्चनाताई राळेभात, मोहन गडदे, विष्णू गंभीरे, प्रविण बोलभट, नगरसेवक संदीप गायकवाड, ऋषिकेश बांबरसे,गोरख घनवट, आण्णा ढवळे,गणेश आजबे, मोहन देवकाते, बाळासाहेब गायकवाड,प्रविण होळकर, विक्रांत घायतडक,ऋषिकेश मोरे, तुषार बोथरा आदींसह महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सुत्रसंचलन दादासाहेब शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार नगरसेवक पवन राळेभात यांनी मानले.

आमदार प्रा राम शिंदेंना सूर गवसला

“गेल्या दहा वर्षांत विकासाचा डोंगर उभा केला.विधानसभेत पडलो तरी महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे नेतृत्व करणाऱ्यास देवेंद्र फडणवीस यांनी संधी दिली.पाच वर्ष नसून दहा वर्ष पाठवले.म्हणून थांबलेला विकास पुन्हा एकदा हाती घेतला.१४०० कोटींची पाणीलाईन कर्जत मार्गे येणार, कर्जत जामखेड साठी पाण्याचा हुसस काढावा लागेल.मी साहेबाला मागणी केली व झाले.काही बाजार भुंगे आले व आडवे – तिडवे केले.कृष्णेच पाणी भिमेत परंतु पाणी कर्जत जामखेड मध्ये आलेच पाहिजे.ही माझी प्रमुख मागणी आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे