अपंग महिलांना शिलाई मशीन वाटप करत महिलादिन साजरा

राहुरी दि.१५ (प्रतिनिधी)
महिलांचा स्वाभीमान जागा होईल हक्क . अधिकार याची जाणीव होईल तेव्हाच महीला दिनास अर्थ प्राप्त होईल असे प्रतीपादन राहुरी खुर्द च्या सरपंच मालती ताई साखरे यांनी केले. ग्रामपंचायत राहुरी खुर्द व महीला बचत गटाच्या संयुक्त माध्यमातुन ग्रामपंचायत कार्यालय राहुरी खुर्द येथे जागतीक महीला दिन कार्यक्रम संपन्न झाला या वेळी त्या बोलत होत्या. ह्या कार्यक्रमा निमीत्ताने ग्रामपंचायत राहुरी खुर्द च्या वतीने अपंग महिलांसाठी शिलाई मशीन चे वाटप करण्यात आले. तर सरपंच राहुरी खुर्द यांचे वैयक्तीक खर्चातुन मिक्सर चे वाटप करण्यात आले .या कार्यक्रामाचे अध्यक्षस्थानी मा. जि प सदस्या जयश्रीताई डोळस व प्रमुख उपस्थीतीत माजी सरपंच सुरेखा शेटे, ज्योती पवार, शिला नजन, सुनिता दातीर, प्राथ.आरोग्य केंद्राच्या डॉ पुजा झिरपे, मिना घोकसे, मनिषा शेंडे, ह्या होत्या ह्या कार्यक्रमा वेळी आरोग्यसेविका ज्योती तोडमल, वनिता फलके, आशासेविका अनिता शेडगे, योगीता चावरे, दिपाली निमसे, मनिषा वाणी, सविता गुंड, शाहीन शेख, निलीमा क्षीरसागर, ग्रामसेवक संभाजी निमसे, पोलीस पाटील बबनराव आहीरे यांना कोरोना येद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अंगणवाडी सेविका व मदतनिस
सुशिला मंडलीक, सुनिता म्हस्के, मंदाताई शेडगे, उषा वाघ, रंजना निमसे, सविता गडदे, ज्योती शेटे, दिक्षा जोगदंड, आलका म्हस्के, अश्विनी शेडगे, अंजना डोळस, सुनिता पिसाळ, संगीता भालेकर, शोभा निमसे, आशा नजन, यांचे सत्कार करण्यात आले.
अतिषय खडतर परिरथी असताना आपल्या मुलांना उच्च शिक्षीत करून नोकरीस लावले त्या छाया घोरपडे यांचा अदर्श माता म्हणुन सन्मान करण्यात आला तर तब्बल ३५ वेळा रक्तदान केले म्हणुन प्रविण मेहत्रे यांचा ही यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी राहुरी खुर्द येथील ग्रा प सदस्य नरेंद्र शेटे बाळु कटारनवरे शिवाजी पवार यासह महिला बचतगट बहुसंख्य महीला उपस्थीत होत्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आप्पासाहेब ढोकणे यांनी केले तर उपसरपंच तुकाराम बाचकर यांनी उपस्थीतांचे आभार मानले.