अनुसूचित जाती जमातीच्या व भटक्या विमुक्त जमातीच्या जास्तीत जास्त लोकांना सत्ताधारी व शासनकर्ते बनण्याची सुवर्णसंधी भाजपातच मिळू शकते! भाजप पदाधिकारी नियुक्ती प्रसंगी ऍड.वाल्मिक (तात्या) निकाळजे यांचे प्रतिपादन!

अहमदनगर (प्रतिनिधी) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान देशाला अर्पण करताना या देशात राजकीय स्वातंत्र्याचे आर्थिक स्वातंत्र्यात, सामाजिक स्वातंत्र्यात व राजकीय लोकशाहीचे सामाजिक लोकशाहीत रूपांतर झाले पाहिजे हे त्यांचे खऱ्या आर्थिक व सामाजिक लोकशाहीचे स्वातंत्र्याचे स्वप्न या देशात भारतीय जनता पार्टीच खऱ्या अर्थाने साकार करू शकते असे प्रतिपादन भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, अहमदनगर महानगर, अहमदनगर दक्षिण व अहमदनगर उत्तर या तिन्ही जिल्ह्याचे अनुसूचित जाती मोर्चा प्रभारी, राज्याचे जेष्ठ मानवी हक्क विशेषज्ञ व फुले आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते ऍड.वाल्मिक (तात्या) निकाळजे यांनी केले.
अहमदनगर येथे आयोजित भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या अहमदनगर महानगर जिल्हा व अहमदनगर दक्षिण जिल्ह्याच्या पदाधिकारी नियुक्ती च्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे बोलताना ऍड.वाल्मिक तात्या निकाळजे म्हणाले की भाजपा व्यतिरिक्त इतर सर्व राजकीय पक्षांमध्ये घराणेशाही व जातीवाद आहे.फक्त भाजपाच जगातील एकमेव राजकीय पक्ष आहे ज्यात घराणेशाही नसून विश्वरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली लोकशाही भाजपात आहे.कारण भारतीय जनता पार्टी केवळ लोकशाही मानणारा पक्ष आहे.भाजपात कोणत्याही जाती धर्माची स्त्री व पुरुष सर्वोच्च सत्ता पदावर कधीही विराजमान होऊ शकते.
आदरणीय लालकृष्ण अडवाणी हे देशाचे उपप्रधानमंत्री असताना त्यांच्या सभेत खाली जमिनीवर बसलेले सामान्य कार्यकर्ते नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री होऊ शकतात, अनुसूचित जातीचे ऍड.रामनाथ कोविंद व अनुसूचित जमातीच्या द्रौपदी मुर्मू हे या प्रचंड महाकाय भारत देशाचे महामहिम राष्ट्रपती बनू शकतात ही किमया फक्त भाजपच करू शकते.भारतातील इतर सर्व पक्ष घराणेशाही व जातीवाद जपत आहेत. भाजपचा देशातील व राज्यातील एकही नेता घराणेशाहीने सत्ताधारी झालेला नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना त्यांची जातपात व धर्म न पाहता राजकीय सत्ता व राजकीय, सामाजिक, आर्थिक सत्तापदे व सन्मान देणारा भाजपा हा देशातील व राज्यातील एकमेव पक्ष आहे. भाजपमध्ये जे प्रामाणिकपणे चांगले काम करतात त्यांच्या कामाचे नक्कीच चीज होते. कोणत्याही जातीची, कोणत्याही कुटुंबाची व कोणत्याही व्यक्तीची मक्तेदारी भाजपा निर्माण होऊ देत नाही व खपवूनही घेत नाही! त्यामुळे अनुसूचित जाती, जमाती, भटके व विमुक्त समाजास या देशात व राज्यातील भाजपात उत्कृष्ट काम करण्याची, सर्व प्रकारची सत्तापदे हस्तगत करण्याची सुवर्णसंधी व उज्वल भवितव्य आहे असे प्रतिपादन केले.
शहर भाजपच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा अहमदनगर महानगर जिल्हाध्यक्ष महेंद्र भय्या गंधे हे होते. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष भय्या गंधे म्हणाले की, या देशाच्या प्रगल्भ लोकशाहीचे स्वप्न पाहताना म.गांधी हे म्हणाले होते की जेव्हा या देशातील वाल्मिकी किंवा तत्सम अशा अत्यंत तळागाळातील व्यक्ती या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होईल तेव्हा या देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले असे होईल व डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जेव्हा अस्पृश्यता व जातीवाद ही हिंदू धर्मावरील व या देशावरील कलंक आहे ही व ती नष्ट करून विषमता मुक्त भारत करण्याचे स्वप्न जेव्हा भारतातील स्पृश्य लोक पाहतील तसेच जाती जातीतील विषमता नष्ट झाली नाही तर हा देश पुन्हा पारतंत्र्यात जाईल हे लक्षात घेऊन म.गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विषमता मुक्त भारताचे स्वप्न भाजपा साकार करण्याचे काम करीत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत सामाजिक व आर्थिक लोकशाही व सामाजिक आर्थिक स्वातंत्र्य या देशात प्रस्थापित करण्याचा आटोकाठ प्रयत्न भारतीय जनता पक्ष करीत आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके व विमुक्त जमाती या समतेसाठी झटणाऱ्या व झगडणाऱ्या तळागाळातील समाजातील जास्तीत जास्त लोक भाजपात सामील झाले तर तेच येथे सत्ताधारी होतील व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न लवकरात लवकर साकार होईल.वंचित शोषित समाजाचे व सर्व जाती धर्माचे जास्तीत जास्त लोक भाजपात सामील होत असल्यामुळेच भाजपा हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष झालेला आहे. भाजपा हा तळागाळातील सामान्य कार्यकर्त्याला न्याय देत मोठं करणारा हा पक्ष आहे त्यामुळे सर्वांनी भाजपात सामील होण्याचे आवाहन भय्या गंधे यांनी केले.
यावेळी अनुसूचित जाती मोर्च्याचे अहमदनगर शहर अध्यक्ष चंद्रकांत पाटोळे, ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, राजू मंगलारप, लक्ष्मिकांत तिवारी, आकाश पंचमुख, रोहन शेलार, शुभम पाथरे, हृषीकेश जोशी, सागर अल्हाट, नाना जगताप आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात अनुसूचित जाती जमाती मोर्च्याच्या नगर दक्षिण जिल्हा सरचिटणीस पदी विजय पाथरे, शहर उपाध्यक्ष पदी सुनील भोसले, जिल्हा सरचिटणीस पदी संजय भिंगारदिवे आदींना भाजपा पदाधिकारी नियुक्ती पत्रे देऊन भाजपाचे उपरणे घालून सर्वांचे भाजपात स्वागत करण्यात आले.
यावेळी केक कापून व सत्कार करून भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे नगर तालुकाध्यक्ष रोहण शेलार यांचा वाढदिवस सर्वांनी साजरा केला व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत पाटोळे यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर काळे यांनी मानले.