राष्ट्रीयस्तरीय तबलावादन स्पर्धेत वेदादित्य संगीत विद्यालयाचे यश !
आ.निलेश लंके यांनी बाल स्पर्धकांचे कौतुक करत भावी कार्यासाठी दिल्या शुभेच्छा !

पारनेर दि.२३ मे (प्रतिनिधी) :
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात संगीत क्षेत्राला एक महत्त्व प्राप्त झाले असून या महाराष्ट्राच्या मातीने आजवर देशाला संगीत क्षेत्रात अनेक मौल्यवान हिरे दिले आहेत.बालवयातच संगीताचा व्यासंग लागलेले अनेक विद्यार्थी पारनेर तालुक्यातून संगीत शिक्षण घेत आहेत त्यापैकीच अखिल भारतीय सांस्कृतिक संघ ,पुणे आयोजित पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन पुणे येथे रविवारी झालेल्या १८ व्या राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात तबलावादन स्पर्धेत राज्यभरातून अनेक विद्यालय व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यात वेदादित्य संगीत विद्यार्थी रोहित नगरे याने प्रथम क्रमांक तर पुजा दिवेकर व तनुश्री चौरे यांनी द्वितीय क्रमांक मिळवीला व प्रांजली वाळुंज या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक मिळवला तसेच आर्या वाळुंज व वेदांत ठुबे यांनी ( चेअरमन अॅवॉर्ड ) मिळवत या महोत्सवात घवघवीत यश संपादन केले.
या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षक गुरुवर्य रामदास महाराज ठुबे यांनी अनमोल मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय पातळीवरील यशाबद्दल आमदार निलेश लंके मा.सिताराम खिलारी सर, सरपंच अरुणाताई बाळासाहेब खिलारी,ढोकेश्वर विद्यालयाचे प्राचार्य मा.जावळे सर व सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांची दुबई येथे होणाऱ्या १० व्या कल्चरल ऑलिम्पियाड परफॉर्मिंग आर्टसाठी निवड झाली आहे .
अल्पवयातच राष्ट्रीय स्तरीय संगीत क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या या सर्व बाल विद्यार्थ्यांचे आमदार निलेश लंके यांनी कौतुक करत या विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या या सर्व विद्यार्थ्यांचे संपूर्ण पंचक्रोशीतून कौतुक होत आहे .