राजकिय

सुशासन आणि विकासाचे पर्व म्हणजे मोदी सरकारची १० वर्षे : खा. डॉ. सुजय विखे पाटील

पाथर्डी दि. 23 एप्रिल (प्रतिनिधी)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दशकापुर्तीच्या कालखंडाचा उल्लेख करताना महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, सुशासन आणि विकासाचे पर्व म्हणजे मोदी सरकारची १० वर्षे होय. या काळात अनेक कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्याने देशातील सर्वसामान्य माणसापर्यंत विकास पोहचविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यामुळे पं. मोदी यांची विकासाचे मॉडेल जगभर गाजत आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भगवानगड येथील भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या प्रचार सभांना सुरवात केली. ते भारजवाडीतील प्रचार सभेत बोलत होते.
अहिल्यानगर लोकसभेचा प्रचार दुसऱ्या टप्प्यात आला असुन महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी आपल्या विकास कामांच्या जोरावर प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजप, राष्ट्रवादी अजितदादा पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि इतर मित्र पक्षांनी त्यांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी सभा घेण्याचे काम सुरू केले आहे. याच धर्तीवर भारजवाडी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आम. मोनिका राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, संजय बडे, तालुका अध्यक्ष मृत्यंजय गर्जे, बाळासाहेब गोल्हार, अजय रक्ताटे, प्रतिक खेडकर, माणिकराव बटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी देशातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविला आहे. गरीब कल्याण योजनेच्या माध्यामातून ८० कोटी हून अधिक परिवार मोफत धान्य योजनेचा लाभ घेत आहेत. ५० कोटी हून अधिक लोकांना जनधन योजनेचा लाभ मिळाला आहे. ३४ कोटी हून अधिक लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यामातून आरोग्य कवच प्राप्त झाले आहे. ४ कोटी हुन अधिक लोकांचे पीएम आवास योजनेच्या माध्यातून पक्क्या घराचे स्वप्न पुर्ण झाले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे