वाळकी येथील खुनाच्या व खंडणीच्या गुन्ह्यातील मागील तीन महिन्यापासून फरार असणाऱ्या आरोपीच्या हस्तकास नगर तालुका पोलिसांनी केले गजाआड!

अहमदनगर दि. २४ जुलै (प्रतिनिधी) वाळकी येथील खुनाच्या व खंडणीच्या गुन्ह्यातील मागील तीन महिन्यापासून फरार असणाऱ्या आरोपीच्या हस्तकास नगर तालुका पोलिसांनी केले गजाआड केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. या कारवाईची आधिक माहिती अशी की
अशी की, दि.30/04/2023 रोजी सायंकाळी 04/15 वा चे सुमारास मी माझे वाळकी गावातील कापड दुकानावर असताना, मला माझी चुलत बहीण् साक्षी शिवाजी लोखंडे हिने फोन करुन सांगितले की,इंद्रजित रमेश कासार व त्याचा जोडीदार शुभम उर्फ भोले जनार्धन भालसिंग असे स्पेंल्डर मोटार सायकलवर घरी आले आहेत. ते दोघे जण आई शोभा हिस दुकान चालू ठेवण्यासाठी पैंसे मागत आहेत, व शिवीगाळ करत आहेत. तेव्हा तू लवकर घरी ये असे म्हणाली, तेव्हा मी ताबडतोब दुकान बंद करुन वस्तीवर घरी गेलो तेव्हा माझी चुलती शोभा शिवाजी लोखंडे यांचे घरासमोर इंद्रजित कासार शुभम भालसिंग असे माझी चुलती हिस 2,70,000 हजार रुपयाची खंडणी म्हणून दे, नाहीतर तुमचा बेत पाहू असे म्हणून शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देत असताना तेथे माझे वडील नाथा ठकाराम लोखंडे तेथे आले तेव्हा ते त्यांना म्हणाले कशाचे पैंसे मागता पैंसे देयचे काय कारण असे म्हणाले असता इंद्रजित कासार याने माझे वडील यांना शिवीगाळ करु लागला व तुम्हाला दुकान चालू ठेवायचे असतील तर तुम्ही पैंसे देवून टाका तेव्हा वडिल त्यास म्हणाले की, तू येथून निघून जा असे म्हणाल्याचा त्यास राग आल्याने त्याने माझे वडिलांचे पोटात व छातीत लाथा मारल्या त्याच वेळी त्याचा जोडीदार शुभम जनार्धन भालसिंग याने पण माझे वडिलांचे छातीवर लाथ मारली त्यानंतर वडील खाली पडले तेव्हा त्यांची व आमची झटापट झाली तेव्हा मी व माझा भाऊ ऋषिकेश शिवाजी लोखंडे असे आम्ही वडीलांना त्यांचे तावडीतून सोडविण्यासाठी मधे पडलो असता आम्हाला पण त्या दोघांनी लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली आहे.त्यानंतर माझे वडील बेशुदध् झाल्याने माझा भाऊ रवि नाथा लोखंडे व चुलत भाऊ निशांत आप्पासाहेब लोखंडे,अभिजित रावसाहेब लोखंडे अशांनी आमची इरटीका कार नं.MH 16 M 4141 ही मधे माझे वडील नाथा ठकाराम लोखंडे यांना घालून प्रथम शिव हॉस्पीटल डॉ.काटकर ,वाळकी यांचे दवाखान्यात उपचाराकामी नेले. नंतर आनंदऋषि हॉस्पीटल अहमदनगर येथे उपचाराकामी घेवून गेले. त्यादरम्यान मी घरी असताना माझा मोबाईल् अशोक उर्फ सोनू गुंड यांनी पण शिवीगाळ करुन म्हणाले की उचलून घेवून जिवे मारण्याची धमकी दिलेबाबत मला रविने सांगितले. आनंदऋषि हॉस्पीटल येथे उपचारादरम्यान माझे वडील मयत झाले आहेत अशा मजुकाराचीफिर्याद अनुराज नाथा लोखंडे यांनीदिल्याने नगर तालुका पोलीस स्टेशन गुरनं 376/23 भादवी कलम 302, 384,387,386, 120 (ब), 75, 34 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचे गार्भिय लक्ष्यात घेवून मा. पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सो यांनी तात्काळ गुन्हयातील आरोपी यास ताब्यात घेण्यासंदर्भात सुचना दिलेल्या होत्या. सदर गुन्ह्यातील आरोपी नामे इद्रजीत रमेश कासार व शुभम उर्फ भोले जर्नाधन भालसिंग यास यापूर्वीच ताब्यात घेवून अटक करण्यात आले होते. सदर गुन्हयातील विश्वजीत रमेश कासार याचा हस्तक सराईत आरोपी नामे अशोक उर्फ सोनू गुंड रा. वाळकी हा मागील तीन महिन्यापासून फरार होता.
सदर आरोपीचा शोध घेणेकामी सहायक पोलीस निरीक्षक श्री शिशिरकुमार देशमुख, नगर तालुका पोलीस स्टेशन यांनी पोउनि युवराज चव्हाण, पोहेकॉ/सुभाष थोरात, पोकॉ/कमलेश पाथरुट, संभाजी बोराडे, राजू खेडकर, विक्रांत भालसिंग असे पोलीस अधिकारी व अंमलदार याचे पथक तयार करुन सदर आरोपी ताब्यात घेण्यासंदर्भात सुचना व मार्गदर्शन केले. सदर पथक आरोपीचा शोध घेत असतांना श्री शिशिरकुमार देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक यांना गुप्त बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील फरार आरोपी नामे अशोक उर्फ सोनू गुंड हा पुणे येथून केडगाव परिसरामध्ये येणार आहे तुम्ही केडगाव परिसरामध्य जावून सापळा लावून थांबा असा आदेश दिल्याने सदर पथक हे केडगाव परिसरामध्ये जावून सापळा लावून थांबले असता थोडयाच वेळामध्ये गुन्हयातील आरोपी हा केडगाव परिसरामध्ये संशयीतपणे तोंडाला रुमाल बांधून येताना दिसला सदर पथकाची खात्री होताच त्यास ताब्यता घेवून नाव व गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अशोक उर्फ सोनू गुंड वय 29 वर्ष रा. वाळकी ता.जि. अहमदनगर असे असलेचे सांगितले. त्यास ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणून त्यास मा. न्यायालयामध्ये हजर केले असता मा. न्यायालयाने 4 दिवस पोलीस कस्टडी दिलेली आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री शिशिरकुमार देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक, नगर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदर आरोपी हा मुख्य मोक्का गुन्हयातील फरार आरोपी विश्वजीत कासार रा. वाळकी याचा मुख्य हस्तक असून त्याच्यावर यापूर्वी देखील मुख्य आरोपीकरीता खंडणी मागणे, मारहाण करणे अशा प्रकारचे खालील गुन्हा दाखल आहेत.
1) नगर ता. पोस्टे गुरनं 92/2021 भादवी कलम 384, 386, 120 (ब), 34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.*
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला सो पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, श्री संपतराव भोसले सो सपोनि शिशिरकुमार देशमुख, पोउनि पोउनि युवराज चव्हाण, पोहेकॉ/सुभाष थोरात, पोकॉ/कमलेश पाथरुट, संभाजी बोराडे, राजू खेडकर, विक्रांत भालसिंग यांचे पथकाने केलेली आहे.