ब्रेकिंग

माजी मंत्री आ. थोरातांची यशस्वी शिष्टाई लंके – काळेंमध्ये बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा! शहर काँग्रेस मैदानात उतरणार!

 

  • अहमदनगर दि. 2 एप्रिल (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आ. निलेश लंके यांच्या प्रचार शुभारंभाच्या पाथर्डीतील कार्यक्रमापासून अलिप्त असणाऱ्या शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे आणि शहर काँग्रेसच्या नाराजी नाट्यावर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या यशस्वी शिष्टाई नंतर पडदा पडला आहे. सोमवारी रात्री उशिरा निलेश लंके आणि किरण काळे यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास बंद दारा आड चर्चा झाली. त्यानंतर लंके, काळे यांनी शहर काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी एकत्रित संवाद साधला. यामुळे आता काळे यांच्यासह शहर काँग्रेसच्या नाराजी नाट्यावर पडदा पडला आहे. किरण काळेंसह शहर काँग्रेस देखील आता लंकेंसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे.

    आतापर्यंत शहर काँग्रेस लंके यांच्या प्रचारापासून दूर असल्याचे पाहायला मिळत होते. तशा बातम्या देखील प्रसारित झाल्या होत्या. त्यानंतर मात्र सूत्रे वेगाने फिरली. निलेश लंके हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे राज्यातले बडे नेते असून नगर दक्षिण आणि उत्तर अशा दोन्ही मतदारसंघांमध्ये थोरात यांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. थोरात यांनी लंके आणि काळे या दोघांशी संवाद साधत यशस्वी शिष्टाई केल्यामुळे आता लंके यांना शहरात काँग्रेसचे बळ मिळणार आहे.
    यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, काँग्रेस कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, माथाडी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष सुनील भिंगारदिवे, सावेडी विभाग प्रमुख अभिनय गायकवाड, काँग्रेसच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. सुजित क्षेत्रे, क्रीडा, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आकाश आल्हाट, शहर जिल्हा सचिव रोहिदास भालेराव, युवक काँग्रेस सरचिटणीस आनंद जवंजाळ आदींसह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

  • ⭕बुधवारच्या बैठकीकडे लक्ष :बुधवारी सायंकाळी सात वाजता शहर काँग्रेसची बैठक किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. लंके यांच्या शहरातील प्रचाराची काँग्रेसची रणनीती ठरविली जाणार आहे. लंके, काळे यांच्यातील बैठकीनंतर आता काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीकडे शहराचे लक्ष लागले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे