श्री संत बाळूमामा (मेंढी माऊली) प्रतिष्ठान, भोसे-चखालेवाडी आयोजित बालकुमार चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

भोसे दि.२४ मे (प्रतिनिधी)
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त श्री संत बाळूमामा (मेंढी माऊली) प्रतिष्ठान, भोसे-चखालेवाडी यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसे,चखालेवाडी,वागनळी, बिटकेवाडी,भावडी, रुईगव्हाण,
कोसेगव्हाण येथील बालकुमारांसाठी चित्रकला स्पर्धा तसेच टाकळी लोणार आणि तांदळी दुमाला येथील माध्यामिक विद्यालयातील विद्यार्थ्यासाठी निंबध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
यापैकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चखालेवाडी येथील बालकुमारांचा पारितोषीक वितरण सोहळा पार पडला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.काळे मॅडम, शिक्षक शैलेंद्र ठवाळ यांनी ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन बालकुमारांचे कौतुक करत, ‘चित्रकला ही दैवी देणगी असली तरी प्रयत्नांची पराकाष्ठा आणि सततचा सराव यामुळे तुम्ही जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवू शकता असे मार्गदर्शन केले.
तसेच सर्वच स्तरातून विजेत्यांना आणि स्पर्धेकांना भावी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.