अवैध स्वेच्छा निवृत्तीस,जबाबदार दोषी अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन करून कारवाई करण्याची जन आधार सामाजिक संघटनेची मागणी!मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालना समोर ठिय्या आंदोलन!

अहमदनगर दि.२३ मे (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. हंसराज आसाराम पाटेकर २ ते ३ वर्षांपासून कार्यरत होता. त्या पूर्वी तो ज्या ठिकाणी कार्यरत होता, तेथील त्याच्या विरोधातील तक्रारीमुळे पंचायत समिती नेवासे चे गटविकास अधिकारी यांनी डॉ. हंसराज पाटेकर या पशु वैद्यकीय डॉ. ला २०१८ मध्ये १ वर्षासाठी निलंबित केले होते. तो २०२२ मध्ये मौ. माका तालुका नेवासा या ठिकाणी कार्यरत असताना, त्यावेळी “लम्पी” या जनावरांवरील आजारामुळे नेवासा तालुक्यात माका या ठिकाणी सर्वाधिक जनावरांचे मृत्यू झाले, त्यामुळे हा पशू वैद्यकीय डॉ. अधिकच चर्चेत आला होता.तसेच त्याच्या विरोधात नेवासा तालुक्याच्या पशुसंवर्धन विभागाचे खाते प्रमुख यांनी दि.७ नोहेबर २०२२ रोजी गट विकास अधिकारी यांना तक्रारींचा सविस्तर अहवाल सादर केल्याने,त्यावर गट विकास अधिकारी नेवासा मा.संजय दिघे यांनी हंसराज पाटेकर याच्या विरुद्ध गंभीर स्वरुपाच्या प्राप्त झालेल्या तक्रारींमुळे त्याला निलंबित करून त्यांचेविरुध्द कारवाई करण्याचा प्रस्ताव दि. ११ नोहेबर 2022 रोजी जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी मा. संजय कुमकर यांना सादर केलेला होता.
निलंबनाची कारवाई जिल्हा परिषद करणार असे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ.हंसराज पाटेकर यांना आधीच कळाल्याने त्यांनी दि. ०४ नोहेबत २०२२ रोजी संबंधित विभागाला स्वेच्छा निवृत्ती मिळणे बाबतचा अर्ज केला होता. त्याच्या विरोधात निलंबनाची तक्रार असताना देखील संबंधित विभागाने कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा शहानिशा न करता,तसेच त्याचे लेखी म्हणणे न घेता,केवळ डॉ.हंसराज पाटेकर याला या प्रकरणातून वाचवण्यासाठी त्याच्या कडून अवैध रक्कम घेऊन त्याला पळवाट म्हणून १२ डिसेंबर २०२२ रोजी जाणीवपूर्वक घाईघाईने सर्व नियम पायदळी तुडवत,त्याच्या निलंबनाचा प्रस्ताव आपल्या कार्यालयात असताना,तसेच त्याची शासकीय सेवा वर्ष भर बाकी असताना, त्या वेळी जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपकार्यकारी अधिकारी मा.संदीप कोहिनकर यांनी आपल्या लेखी आदेशाने ताबडतोब ही सेवानिवृत्ती देऊन त्याच्यावर होणारी कारवाई जाणून बुजून टाळली असून, वास्तविक पाहता सहायक पशुधन विकास अधिकारी ही क्लास ३ ची पोस्ट असल्याने, त्याच्यावर कारवाई करणे किंवा त्याला स्वेच्छा निवृत्त करणे हा पूर्णपणे अधिकार जिल्हा परिषद चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना असतो.परंतु या विषया मध्ये त्या वेळी असणारे जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपकार्यकारी अधिकारी मा.संदीप कोहिनकर यांनी या हंसराज पाटेकर डॉक्टर वर निलंबनाची तसेच अनियमितते बाबत कारवाई सुरू असतानाही, केवळ आर्थिक तडजोडीच्या च्या उद्देशाने,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अंधारात ठेऊन आपल्या पदाचा गैरवापर करून,नेवासा तालुक्याचे गट विकास अधिकारी मा.संजय दिघे आणि पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद मा.संजय कुमकर यांना हाताशी धरून ही अवैध प्रक्रिया पार पाडली. एखाद्या पशुधन विकास अधिकाऱ्याला सेवानिवृत्त करण्याचा अधिकार हा जिल्हा परिषदेच्या उपकार्यकारी अधिकाऱ्याला (सामान्य प्रशासन) ला आहे का ? आणि तो असल्यास तसा शासन निर्णय आम्हाला मिळावा.याच पशू वैद्यकीय डॉ.हंसराज पाटेकर चे २०१८ साली,केलेल्या निलंबन कार्यवाही नंतर त्याचा निलंबन कालावधी नियमित केलेला होता का ? त्यावेळी देखील त्याच्या वर कुठल्याही प्रकारची ठोस कार्यवाही न करता केवळ नोटिसा दिलेल्या आहेत.त्या प्रकरणाचा देखील निकाल बाकी आहे. तसेच त्याला आता म्हणजे २०२२ मध्ये सेवा निवृत्त करताना,त्याच्या वर गटविकास अधिकारी नेवासे यांनी दि. ११ नोहेबर2022 रोजी निलंबन प्रस्ताव दिलेला असताना त्याकडे जिल्हा परिषद विभागाने पूर्ण पणे डोळे झाक का केली गेली ? तसेच कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यावर चौकशी सुरू असताना, कारवाई प्रस्तावित असतांना, त्याच्या विरुध्द गंभीर स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या असंतांना, तसेच मागच्या काळातील गैरवर्तणाबाबत कारवाई पुर्ण झाली नसतांना,सेवा निलंबन कालावधी चा निर्णय घेणे बाकी असतांना स्वेच्छा निवृत्ती देता येते का ? या सर्व गोष्टी आम्हाला लेखी कळवाव्यात यामध्ये डॉ. हंसराज पाटेकर किती दोषी आहे,या पेक्षा त्याला मदत करणाऱ्या भ्रष्ट शासकीय अधिकाऱ्यांचा चाललेला काळाबाजार हा स्पष्ट दिसत असून लवकरात लवकर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जनअधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करताना जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे,समवेत दीपक गुगळे, रोहिणी पवार,आनंद शिंदे,भारत जगदाळे, संदीप तेलधुने, प्रिया पाटील, बेबी रेपाळे, रेखा डोळस,अमित गांधी, गौतमीताई भिंगारदिवे,शहानवाज शेख, शेहबाज शेख, अप्पासाहेब केदारे, आदिसह उपस्थित होते.
पैसे घेऊन अवैधरित्या मदत करणारे, नेवासे तालुका गटविकास अधिकारी संजय दिघे, पशू वैद्यकिय अधिकारी जिल्हा परिषद संजय कुमकर व महत्वाचे म्हणजे निलंबनाची फाईल आपल्या कडे असतानाही,आणि स्वतः ला स्वेच्छा निवृत्ती देण्याचा अधिकार नसतानाही आपल्या पदाचा गैर वापर करणाऱ्या त्या वेळी जिल्हा परिषद अहमदनगर चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि सध्याचे सोलापुर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी भ्रष्ट अधिकारी संदीप कोहिनकर यांचे तत्काळ निलंबन करून,कठोर कारवाई करण्यात यावी .