सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरावस्था केली उघड! जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे यांनी केली पाहणी

अहमदनगर दि.२१ जानेवारी (प्रतिनिधी)- मागील आठवड्यात नगर तालुक्यातील बुरडगाव शाळेमध्ये जन आधार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी संघटनेच्या पदाधिकारी याच्या समवेत शाळेची पाहणी केली. त्यावेळी त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सर्व १२ वर्ग खोल्या या अतिशय जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत आढळल्या. ही सर्व बाब लक्षात येताच जन आधार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्व वस्तू स्थिती माडून समाजा समोर उघड केली. तसेच ही बाब जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे यांना देखील कळविली. त्यानंतर या गोष्टीची दखल घेत या शाळेची प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी करून आवश्यक असणाऱ्या ५ वर्ग खोल्या तातडीने मंजूर करू असे आश्वासन त्यांनी दिले. मागील वर्षी त्या ठिकाणी २ खोल्या मंजूर झाल्या परंतु निर्लेखना अभावी अद्याप पर्यंत त्यांचे काम सुरू होऊ शकलेले नसल्याने तो विषय देखील तातडीने मार्गी लावण्याचे आदेश त्यांनी उपस्थित शिक्षण आणि बांधकाम अधिकाऱ्यांना दिले. त्यात आवश्यक असणाऱ्या आणखी ३ खोल्यांची मंजुरी देऊन एकूण ५ खोल्या तातडीने करून दिल्या जातील असे आश्वासन लांगोरे यांनी दिले.
जिल्हापरिषद शाळा मौ. बुरुडगाव ता-नगर येथे अधिकाऱ्यांच्या निर्लेखनाच्या खेळापाई मागील ३ वर्षांपासून 127 विद्यार्थी भयभीत अवस्थेत शिक्षण घेत आहेत . या शाळेवर ५ शिक्षक असून मुलांना बसण्यासाठी ५ आणि मुख्याध्यापकासाठी १ अशा ६ वर्ग खोल्यांची (उत्कृष्ट बांधकाम असणाऱ्या) खोल्याची गरज आहे. परंतु या साठी केवळ दोन वर्ग खोल्या मंजूर असून यामध्ये देखील एक मोठी अडचण आहे, ती निर्लेखनाची ? ती जबाबदारी घेणार तरी कोण? जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच शिक्षण विभागाच्या नियमानुसार पूर्वीच्या ५ शाळा वर्ग खोल्या आहेत त्यांच निर्लेखन (पाडून )करून त्या नंतर मंजूर असलेल्या २ खोल्या बांधन्यात येतील. जवळपास ९ वर्ग खोल्या पाडण्याच्या स्थितीत आहेत. म्हणजे एकूण १२ उपलब्ध असलेल्या खोल्यांपैकी ३ वर्ग खोल्यांमध्ये बसण्यास योग्य आहेत. परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी ५ वर्ग भरत आहेत याचा अर्थ दोन मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये मुले आपला जीव धोक्यात घालून बसत आहेत आणि त्या चिमुरड्यांना या गोष्टीविषयी कल्पना देखील नाही,
ही सर्व बाब लक्षात घेऊन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे यांनी शाळेच्या परिसराची पाहणी करुन तातडीने या शाळेसाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे, गट शिक्षणाधिकारी बापूराव जाधव, नगर तालुका जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आजिनाथ खेडकर, उपअभियंता शिवाजी राऊत आदी उपस्थित होते.