राजकिय
महिला कार्यकर्त्यांनी केला नूतन सभापतींचा सत्कार!

अहमदनगर (प्रतिनिधी) महानगर पालिकेतील विविध पक्षाच्या ९ नगरसेवकांची स्थायी समितीच्या सदस्यपदी आठ दिवसांपूर्वी निवड करण्यात आली.तसेच स्थायी समितीच्या नूतन सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांची नुकतीच निवड करण्यात आली.नगर शहराचे लाडके आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत त्यांनी पदभार स्वीकारला.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महिला पदाधिकार्यानी नुकताच नूतन सभापती वाकळे यांचा सत्कार केला.यावेळी संपादक महेश भोसले,ज्येष्ठ नेते नितीन कसबेकर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या महिला जिल्हा अध्यक्षा गौतमी भिंगारदिवे, हिरा भिंगारदिवे,रंजना भिंगारदिवे,रेखा डोळस,आरती शेलार,शकुंतला लोखंडे,मनीषा खंडागळे आदी उपस्थित होते.