अहमदनगर दि. 8 मार्च (प्रतिनिधी )
दि.07/03/2024 रोजी मा. सविस्तर हाकिकत असे ते शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, इसम नामे. संदीप नवनाथ माळी रा. मळेगाव ता. शेवगाव याने वाढदिवसानिमीत्त तलवारीने केक कापलेचा स्टेटस मोबाईलला ठेवला होता. व समाजात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर प्रसिद्ध करून दहशत करत आहे अशी बातमी मिळाल्याने लागलीच पोनि/ दिगंबर भदाणे यांचे आदेशाने पोहेकाँ/नाकाडे, पोहेकॉ दराडे, पोशि/शाम गुजाळ, पोशि/बप्पासाहेब धाकतोडे, पोशि/ संपत खेडकर, नगर दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुडू,नितीन शिंदे यांच्या तांत्रिक व लोकेशन मदतीने सदर इसमाचा शोध घेउन बोधेगाव ता. शेवगाव या ठिकाणी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेउन दोन पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात एक पितळी मुठ असलेली दोन फुट लांबीची एक पांढरे रंगाची लोखंडी तलवार मिळून आली. सदर तलवारीचा जागीच पंचनामा करून आरोपी व तलवार ताब्यात घेउन शेवगाव पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांचे आदेशाने पोहेकाँ/नाकाडे, पोहेकॉ दराडे, पोशि/शाम गुजाळ, पोशि/बप्पासाहेब धाकतोडे, पोशि/ संपत खेडकर, नगर दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुडू,नितीन शिंदे यांनी कारवाई केली
तसेच पोलीस निरीक्षक शेवगाव यांनी शेवगाव तालुक्यातील जनतेस आव्हान केले आहे की वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापत असेल व हत्यार बाळगून समाजामध्ये दहशत निर्माण करत असेल व अवैधरित्या गावठी कट्टा व तलवारी चाकू व चोरीच्या उद्देशाने कुणी संशयितरित्या फिरत असतील तर तर शेवगाव पोलिसांच्या ०२४२९ २२१२३३ या क्रमांकावर ती संपर्क करावा खबर देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आव्हान पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी केले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा