अहमदनगर दि. 3 मार्च (प्रतिनिधी )
नमुद बातमीतील हकीकत अशी की, श्री.प्रल्हाद गिते, सहायक पोलीस निरीक्षक, नगर तालुका पोलीस स्टेशन यांना गुप्तबातमीद्वारा मार्फत बातमीमिळाली की, रुईछत्तीसी गावामधे एक इसम अवैध रित्या धारदार तलवार स्वत: जवळ बाळगून गावात दहशत निर्माण करत आहे अशी गोपनीय बातमी मिळाल्याने सपोनी गिते सो. यांनी सदर ठिकाणी जावून खात्री करुन कार्यवाही करणे कामी पोलीस उपनिरीक्षक रजित मराग, पोहेकॉ/रमेश गांगर्डे, पोकॉ/कमलेश पाथरुट, पोकॉ संभाजी बोराडे, पोकॉ सागर मिसाळ पोकॉ विक्रांत भालसिंग पोकॉ/विशाल टकले अशांना कार्यवाही करणेबाबत तोंडी आदेश देण्यात आले.
त्यानुसार वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी रुईछत्तीसी गावात जावून मठपिंपरी कडे जाण्याऱ्या रोडवरील कमानीजवळ जावून सापळा लावून थांबले असता थोडया वेळामध्ये एक इसम हातात तलवार घेवून मठपिंपरी रोडवरुन एक इसम हातात तलवार घेवून येताना दिसला. सदर इसमास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने त्याचे मचिछद्रनाथ उर्फ मोहन नवनाथ खकाळ वय 30 वर्षे रा. रुईछत्तीसी ता जि. अहमदनगर असे असलेचे सगितले. सदर इसमाची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या कब्जामध्ये एक लोखंडी धारदार तलवार मिळून आली सदर तलवार बाबतविचारपूस केली असता त्यांने समाधानकारक उत्तरदिलेले नाही. म्हणून सदर घटनेबाबत पोकॉ/कमलेश पाथरुट यांनी नगर तालुका पोलीस स्टेशन येथेफिर्याद दाखल करण्यात आलेली आहे.सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, श्री संपतराव भोसले सो., सपोनि प्रल्हाद गिते साहेब , पोउनि रंजित मराग, पोहेकॉ/रमेश गांगर्डे पोकॉ/कमलेश पाथरुट, पोकॉ/ संभाजी बारोडे, पोकॉविक्रात भालसिंग, पोकॉ सागर मिसाळ, पोकॉ/सोमनाथ वडणे,पोकॉ/विशाल टकले यांचे पथकाने केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा