नगर दि. 18 फेब्रुवारी (प्रतिनिधी )
2021 पासुन ते 2023 पर्यंत खारे कर्जुने गावात पंधरा वित्त आयोग निधीतून कुठलीच मोठी विकास कामे झाली नाहीत अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते संजूभाऊ बोरुडे यांनी देशस्तंभ न्यूज नेटवर्कला दिली 2021 ते 2023 पर्यंत छोटी व किरकोळ कामे करण्यात आली.परंतू मोठे कुठलेच काम गावातील विकास कामा मध्ये नाही. 2021 ते 2023 मध्ये जिल्ह्यापरिषद अंतर्गत मोठी कामे पूर्ण झाली. पंरतु ग्रामपंचायत अंतर्गत पंधरा वित्त आयोग निधीतून कुठलेच काम झाले नाहीत 2021 ते 2023 नीधी राखीव ठेवत सर्व निधीतून M.I.D.C. पाणी जोडणी करण्यासाठी भरले आहेत. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते संजूभाऊ बोरुडे यांनी दिली माहिती देत असतांना बोरुडे यांनी आवर्जून उल्लेख केला की गावातील घरपट्टी व पाणीपट्टी वसुल केली जात नाहीत व गावातील बरेच मोठे मोठे थकबाकीदार आहेत सामान्य नागरिक जे काही प्रमाणात आपली घरपट्टी व पाणीपट्टी भरतात परंतु बऱ्याच प्रमाणात वसुली होत नाही. मोठ्या पाणीपट्टी थकबाकीदार यांच्या कडे जर कर्मचारी गेले तर, अद्रुष मोठ्या नेत्याचा फोन लगेचच कर्मचाऱ्याला येतो. व तिथे वसुली करण्यात मनाई केली जाते. या मुळेच गावातील ग्रामपंचायतीकडील बुऱ्हानगर योजणेची खुप मोठी थकबाकी आहे. थकबाकी मुळे कधी कधी पाणी पुरवठा बंद होतो. व परिणामी महिना महिना पिण्यास पाणीटंचाई गावात निर्माण होते. नागरिकांचे खुप हाल होतात गावातील घरपट्टी वसुल या साठी करण्यात येत नाहीत. पुढील काळात ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात राहील अशा उद्देशातून गावातील बहुतेक लोकांकडून वसुली केली जात नाही. परंतू ग्रामपंचायत मध्ये गावातील थकबाकीदार निर्माण झाले आहेत. परिणामी गावातील विकास निधी मंजूर करून पाणी पुवठा विभागाला भरावा लागत आहे. व गावचा विकास रखडत ठेवला जात आहे.पंरतु जिल्ह्यापरिषद अंतर्गत ग्रामपंचायत विकास निधी हा अशा प्रकारे वापरता येत नाही. पंरतु ग्रामपंचायत चुकीचे अहवाल सादर करत जिल्ह्यापरिषद अधिकाऱ्यांकडून चुकीची मंजूरी मिळवून दोन तीन वर्षाचा निधी शिल्लक ठेवून अशा प्रकारे वापर करत घेतला आहे. व गावातील विकास कामे रखडत ठेवली आहेत अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते बोरुडे यांनी देशस्तंभ न्यूज नेटवर्कला दिली आहे. पुढील सर्व माहीती माहित अधिकार अंतर्गत विचारून सर्व प्रती समाज माध्यमाला देणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजूभाऊ यांनी देशस्तंभ न्यूज नेटवर्कला बोलतांना दिली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा