पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध भाजपचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ कारवाई करण्याची मागणी- सुमेध गायकवाड

अहमदनगर (प्रतिनिधी)- पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने भाजपचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदवत चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करुन चंपावाणी निषेधच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड समवेत महेश भोसले, सोमा शिंदे, नितीन कसबेकर, गौतमीताई भिंगारदिवे, विशाल गायकवाड ,संघा गायकवाड, अक्षय बोरुडे, धम्मराज गायकवाड, सहील पाचारणे, तेजस गायकवाड, सुरेश भिंगारदिवे, , सुमन कालापहाड, मीरा गवळी, रेखा डोळस, रंजना भिंगारदिवे, संगीता वाल्हेकर, लता बर्डे, हिराबाई भिंगारदिवे, सुनीता भिंगारदिवे, गौतमी भिंगारदिवे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड म्हणाले की, ज्या बहुजन समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील व महात्मा फुले यांनी शिक्षणाची दारे उघडी करुन दिली, त्यांच्याबद्दल चुकीचे विधान निंदनीय आहे. वादग्रस्त व अज्ञानपणाचे विधान करुन समाजात असंतोष पसरविण्याचे काम सत्ताधारी नेते व मंत्री करीत आहे. पुरोगामी महाराष्ट्रात महापुरुषांबद्दल केलेले चुकीचे विधान खपवून घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट करुन, या महापुरुषांच्या संघर्षातून चुकीचे विधान करणार्या मंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे व यांच्यावर कायदेशीर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.