पारनेर – देवदत्त साळवे (तालुका प्रतिनिधी)
पारनेर नगरपंचायतचे नगरसेवक व तालीम संघाचे अध्यक्ष युवराज पठारे यांच्यावर भरदिवसा गावठी कट्ट्यामधून गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला असून गोळी झाडता न आल्यामुळे नगरसेवक युवराज पठारे बालंबाल बचावले आहेत. पठारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ झडप घालून गोळीबार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पकडल्यामुळे पुढील अनर्थ टळला, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून आरोपीला पकडले असून पोलीस निरीक्षक समीर बारवकर पुढील तपास करत आहेत.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा