राहुरी दि. 15 फेब्रुवारी (प्रतिनिधी ) दिनांक 28/12/2023 रोजी दुपारी 01/00 वा चे सुमारास राहुरी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समीती राहुरी येथील जयकिसान कृषी सेवा केंद्राचे येथे फिर्यादी जालींदर चंद्रभान धुमाळ रा. मुसळवाडी ता. राहुरी जि.अहमदनगर हे त्यांचे शेतीसाठी खते खरेदी करत असताना दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांचे खिशातील 34000 रुपये रोख रक्कम जबरीने चोरुन नेली होती. त्याबाबत त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र. नं 1443/2023 भा.द .वि.क 392 प्रमाणे गुन्हा दिनांक 28/12/2023 रोजी दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा सराईत गुन्हेगार (1) कुरबान इस्माईल शेख वय 25 वर्षे (2) दिपक उर्फ खड्डया अशोक वावरे वय 25 वर्षे दोन्ही रा. वार्ड नंबर 2 श्रीरामपुर ता. श्रीरामपुर जि.अहमदनगर यांनी केला असल्याचे गोपनीय माहीती राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. संजय ठेंगे यांना मिळताच त्यांनी तातडीने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.हे.कॉ/ सुरज गायकवाड, पो.हे.कॉ/राहुल यादव , पो.शि नदीम शेख , पो.शि प्रमोद ढाकणे यांचे पथक श्रीरामपुर येथे रवाना केले व त्यांनी दिनांक 09/02/2024 रोजी आरोपी कुरबान इस्माईल शेख व दिनांक 11/02/2024 रोजी आरोपी दिपक उर्फ खड्डया अशोक वावरे यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांना गुन्ह्यामध्ये अटक केली. त्यातील कुरबान इस्माईल शेख याचेविरुध्द श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात (1) गु.र.नं 196/2020 भा.द.वि.क 399,402, आर्म अँक्ट 4/25 (2)गु.र.नं 45/2016 भा.द.वि.क 392,34 (3)307/2014 भा.द.वि.क 379,34 (4) 85/2019 भा.द.वि.क 324,323,504,506,34 (5) आडगांव पो.स्टे जि.नाशिक पोलीस ठाण्यात 58/2018 भा.द.वि.क 392 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीतांना मा.न्यायालयात हजर करुन त्यांची दिनांक 15/02/2024 रोजी पर्यंत टप्याटप्याने 7 दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे. त्यांचेकडे पोलीस कोठडी रिमांडमध्ये केलेल्या तपासात सदर आरोपीतांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असुन त्यांचेकडुन सदर गुन्ह्यात चोरीला गेलेल्या रकमेपैकी 5600 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे तसेच सदर आरोपीतांना हा गुन्हा करण्यासाठी असणारा तीसरा साथीदार बॉबी सोनवणे रा. श्रीरामपुर याचाही गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याची माहीती उघड झालेली आहे. सदर अटक आरोपी (1) कुरबान इस्माईल शेख वय 25 वर्षे (2) दिपक उर्फ खड्डया अशोक वावरे वय 25 वर्षे दोन्ही रा. वार्ड नंबर 2 श्रीरामपुर ता. श्रीरामपुर जि.अहमदनगर यांची परत पोलीस कस्टडी रिमांड घेवुन उर्वरीत 28400 रुपये रोख रक्कम जप्त करण्याची व फरार आरोपी बॉबी सोनवणे रा. श्रीरामपुर यास अटक करण्याची तजवीज ठेवली आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री,राकेश ओला साहेब, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री. वैभव कलुबर्मे साहेब, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस ठाण्याचे पो.नि.संजय ठेंगे साहेब , स.पो.नि. चव्हाण साहेब, पो.हे.कॉ सुरज गायकवाड, पो.हे.कॉ/राहुल यादव , पो.शि नदीम शेख , पो.शि प्रमोद ढाकणे , पो.ना प्रविण बागुल यांनी केली असुन पुढील तपास पो.हे.कॉ विकास वैराळ, पो.हे.कॉ शेळके हे करित आहेत.
(चौकट) -या माध्यमातुन नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या परिसरामध्ये राहत असलेले, रात्री अपरात्री फिरणारे घरफोडी चोरी करणारे चोरटे, खिसेकापु,मोटारसायकल चोर, इलेक्ट्रीक वीजपंप चोर, भुरटे चोर यांच्याबाबत काहीही माहीती द्यावयाची असल्यास आपण वैयक्तिक रित्या आमच्याशी समक्ष संपर्क साधुन माहीती देवु शकता . आपले नाव गोपनीय ठेवले जाईल. असे आवाहन राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. संजय ठेंगे यांनी केले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा