राहुरी दि. 13 फेब्रुवारी (प्रतिनिधी )
राहुरी पोलीस स्टेशन गु र न 224/21 भारतीय दंड विधान संहितेचे कलम 363 अन्वये दिनांक 14/03/21 रोजी गुन्हा दाखल असून दाखल गुण्हयाच्या तपासामध्ये आरोपी दत्तात्रय दादासाहेब गवारे, वय पंचवीस वर्ष राहणार कोळीवाडी तालुका राहुरी यास दिनांक 12/02/2024 रोजी दाखल गुन्ह्याच्या तपास कामी सुरत गुजरात येथून ताब्यात घेवून पीडीतेचा शोध घेऊन आरोपी विरुद्ध 48 तासात मान्य न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले.
सदर गुन्ह्याचा तपास PSI धर्मराज पाटील यांनी केलेला आहे.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे , विभागीय पोलीस अधिकारी डॉ श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात PSI धर्मराज पाटील, पोहेकॉ. राहुल यादव , पोकॉ.गणेश लिपणे, मपोहेकॉ.राधिका कोहकडे यांच्या पथकाने केलेली आहे.
अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणे तथा लैंगिक अत्याचार करणे यावर प्रतिबंध व्हावा म्हणून राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शाळांमध्ये कायदेविषयक जनजागृती करून विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यात येत आहे. आज रोजी पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी राहुरी येथील भागीरथी विद्यालय येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले व अपहरणाच्या कायद्याविषयी माहिती दिली.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा