नगर दि. 12 फेब्रुवारी (प्रतिनिधी ) – प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित विश्व निर्मल फौंडेशन संचलित किड्स सेकंड होम प्री प्रायमरी सहज पब्लिक स्कुल चे 5 वे स्नेहसंमेलन प्रसंगी अध्यक्षस्थानी आ. संग्राम जगताप, प्रमुख पाहुणे पंडित दीनदयाळ चे संस्थापक वसंत लोढा, मा.नगरसेवक धनंजय जाधव, नगरसेवक मदन आढाव, मा. नगरसेविका सौ. वीणाताई बोज्जा,रूट्स प्री स्कुल चे प्राचार्य अपेक्षा परदेशी, संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, उपाध्यक्ष चंद्रकांत रोहोकले, सचिव डॉ. लक्ष्मीकांत पारगावकर, संचालक संदीप ठोंबरे, रुपाली रोहोकले व राणी ठोंबरे आदी उपस्थित होते.
या वेळी अध्यक्ष स्थानावरून बोलतांना आ. संग्राम जगताप म्हणाले लहान मुलांना शिक्षण देणे अवघड काम असून शिक्षणा बरोबरच किड्स सेकंड होम स्कुल अध्यात्मिक शिक्षण देते हे फार महत्वाचे असून विदयार्थ्यांना शैक्षणिक शिक्षणा बरोबरच अध्यात्मिक शिक्षणही देणे महत्वाचे आहे. रूट्स प्री स्कुल ने बोल्हेगाव परिसरात मोठे नाव लौकिक केले असून थोडयाच कालावधीमध्ये मोठे नावलौकिक प्राप्त केले असून 200 पेक्षा जास्त विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी शाळे बाबत माहिती देतांना सांगितले की, आम्ही शाळा स्थापन करतांना सामाजिक बांधिलकी ठेवून समाजासाठी आपण काही तरी देणे लागतो या उद्देशाने कोणताही स्वार्थ न ठेवता कमीत कमी फी मध्ये जास्तीत जास्त सवलती विदयार्थ्यांना कसे देता येईल हा प्रयत्न आम्ही करीत असून लवकरच 1 ली ते 4 थी पर्यंत चे शिक्षण सुरु करण्याचा मानस असल्याचे सांगितले.
यावर्षी चे आदर्श यावर्षीचे आदर्श शिक्षक पुरस्कार सौ दिपाली हजारे व आदर्श विद्यार्थी पुरस्कार कुमारी सानवी जाधव,यशश्री वैरागर, आराध्या न्यालपेल्ली, शरयू गायके,श्रावणी कार्ले,पूर्वी मरकड,मुलांमध्ये ध्रुव साळवे, रुद्र पाटील, आर्यन हजारे, आण्वित कजबे, श्रेयस क्षीरसागर, आदित्य हिवारकर व श्रेयश थोरात या विदयार्थ्यांना देण्यात आले,वर्षभरात झालेल्या विविध कार्यक्रमांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
संस्थेचे कोषाध्यक्ष संदीप गांगर्डे, डान्स टीचर शुभम भालदंड, प्रिन्सिपल संगीता गांगर्डे वैष्णवी नजन, सौ.आरती हिवारकर, सौ. रुपाली जोशी, सौ. पूजा चव्हाण, प्रवीण वाघमारे सर यांनी तसेच पालक वर्गाने अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत रोहोकले यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव डॉ. लक्ष्मीकांत पारगावकर यांनी मानले सूत्रसंचालन शिक्षिका दीपाली हजारे, शुभम भालदंड आणि प्राध्यापिका पूनम मरकड मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन डीएसपी इव्हेन्ट्स यांनी केले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा