ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या नेतृत्वाखाली मनुवादी प्रवृत्ती विरोधात श्रीरामपुर ते हरेगाव काढली जन आक्रोश रॅली

श्रीरामपूर दि. २९ (प्रतिनिधी)ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या नेतृत्वाखाली मनुवादी प्रवृत्ती विरोधात श्रीरामपुर ते हरेगाव जन आक्रोश रॅली काढण्यात आली. ते हरेगाव प्रकरणी श्रीरामपूरला पीडितांना भेट देण्यासाठी आले होते.
हरेगाव तालुका श्रीरामपूर येथे युवराज गलांडे या पाटील सावकाराने आणि त्या बरोबर असणाऱ्या इतर आरोपी यांनी दलित अल्पवयीन मुलांवर चोरीच्या खोट्या आरोपाचा आधार घेऊन त्या निरागस दलित मुलांना झाडाला उलटे टाकून कपडे काढून काठीने मारहाण करण्यात आली. व त्यांना थुंकलेले चाटायला लावले. त्यांच्यावर अंगावर लघवी केली, असा नीचपणा केवळ जातीय दंगली घडवण्याचा उद्देशाने घडवण्यात आलेला आहे , याच्या निषेधार्थ ऑल इंडिया पॅंथर राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी पिढीताना भेट दिली. व या मनुवादी प्रवृत्ती विरोधात व त्याच्या निषेधार्थ श्रीरामपुर ते हरेगाव अशी जन आक्रोश रॅली काढण्यात आली, त्यावेळी हजारोच्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते,
तसेच
महाराष्ट्र अध्यक्ष विनोदजी भोळे
महाराष्ट्र नेते जितेशभाई जगताप
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे
महाराष्ट्राचे प्रवक्ते बंटीदादा सदाशिव यांच्या मार्गदर्शनाने
या रॅलीचे नियोजन
उत्तर अहमदनगर जिल्हा अध्यक्ष – रामदास दारोळे
दक्षिण अहमदनगर जिल्हा अध्यक्ष – योगेश थोरात
दक्षिण अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष – अमर घोडके
शहर जिल्हाध्यक्ष अहमदनगर –
अतुल भिंगारदिवे
युवक जिल्हाध्यक्ष अहमदनगर- सागर ठोकळ
संगमनेर तालुका महिला अध्यक्ष करुणाताई मोकळ
संगमनेर तालुका उपाध्यक्ष अमित खरात
संगमनेर तालुका संघटक लखन खरात
पॅंथर सेनेचे कट्टर कार्यकर्ते स्वप्निल भालेराव
यांनी केले.
या आक्रोश रॅली मध्ये हजारोंच्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते.