सामाजिक

प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना वाचनाची सवय लावावी:महापौर रोहिणीताई शेंडगे

अहमदनगर दि 14 ऑक्टोबर (प्रतिनिधी )-आजची पिढी ही वाचनापासून दूर जात आहे. त्यांना वाचनापेक्षा मोबाईल हा जवळचा वाटतो.परंतु वाचनाने मनुष्य समृद्ध होतो. हे प्रत्येक पालकाला कळते. काही पालक याकडे दुर्लक्ष करतात. पण या पिढीकडे काळजीने मुलांना वाचनाची सवय पालकांनी व गुरुजनांनी लावली पाहिजे, असे प्रतिपादन महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी केले.
अहमदनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निम्मत 350 व्या शिवराज्याभिषेकाचे औचित्य साधून शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर मराठी मनात व्हावा या हेतूने शिवचरित्र पुस्तकांचे प्रदर्शन ग्रंथालयाचे वतीने आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या.
त्यापुढे म्हणाल्या की, अहमदनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात भरपूर पुस्तकांची सामुग्री उपलब्ध करून दिली आहे. या पिढीने याचा लाभ घेतला पाहिजे आणि स्वतःला अधिक समृद्ध केले पाहिजे ही काळाची गरज आहे.
वाचनाने आपल्याला इतिहास व संस्कृती कळते आणि आपण तसे घडतो हे प्रत्येक मुलाने लक्षात घेतले पाहिजे.
आम्ही महानगरपालिकेच्यावतीने जिल्हा ग्रंथालय कार्यालयाची सुसज्ज इमारत उभी करता यावी म्हणून भूखंड देऊ केला आहे.त्यावर लवकरच भव्य इमारत उभी राहून तिचा उपयोग वाचकांना होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रास्ताविक करताना जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर म्हणाले की, उच्च व तंत्र शिक्षण विभाग , ग्रंथालय संचनालय महाराष्ट्र राज्य मुंबई त्यांच्या अधिपत्याखालील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात सत्तावीस हजार पुस्तके उपलब्ध असून ही सर्व पुस्तके दोन वर्षासाठी फक्त शंभर रुपये वार्षिक वर्गणी घरी वाचनासाठी उपलब्ध करून दिली जातात. ही सर्व ग्रंथसंपदा ही ग्रंथालय प्रणालीच्या माध्यमातून सर्वांना ऑनलाईन पाहण्यास उपलब्ध आहे. अवघ्या दोन मिनिटात एखादे पुस्तक सापडते. याचा लाभ नगरच्या रसिक वाचकांनी घेतला पाहिजे असे सांगून त्यांनी शिवचरित्रात्मक पुस्तकाचे प्रदर्शन पाहण्याचा लाभ ३१ ऑक्टोबर पर्यंत सकाळी साडेदहा ते साडेपाच या वेळेत शासकीय सुट्टी वगळून विनामूल्य लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी त्यांनी केले
अध्यक्षस्थानावरून बोलताना महाराष्ट्र साहित्य परिषद नगर शाखेचे अध्यक्ष किशोर मरकड म्हणाले की श्री जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर आणि त्यांच्या सर्व सहकारी यानी ग्रंथालयाला वाचकाभिमुख केले आहे जिवंत स्वरूप दिले त्यामुळे या मंडळींचे कौतुक केले पाहिजे अशी पुस्तके आपल्याला उपलब्ध होत आहे आज महानगरपालिकेने मोकळा भूखंड कार्यालयासाठी देऊन सुसज्ज इमारत होण्यासाठी जे भरीव योगदान दिले आहे त्याचे वाचक म्हणून मी स्वागत करतो.
यावेळी प्रारंभी दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सौ शेंडगे ताई यांनी अभिवादन केले.
स्वागत कार्यालयीन सहाय्यक संतोष कापसे यांनी केले तर आभार व सूत्रसंचालन तांत्रिक सहाय्यक हनुमान ढाकणे यांनी केले.
यावेळी शैलेश घेगडमल, अमोल इथापे, संदीप नन्नवरे, वसंत कर्डिले,संतोष वाडेकर, रेणुका पालवे, अनिल कुसाळकर, लक्ष्मण साखरे, लक्ष्मण सोनाळे, पोपट सांगळे, जयराम आगळे, सुदाम मडके आदींसह बहुसंखवाचक व वाचनालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते .

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे