श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव प्रकरणातील मुख्य आरोपी नाना गलांडेला अटक कधी..? आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा संतप्त सवाल

हरेगाव दि. २९ ऑगस्ट (प्रतिनिधी) अहमदनगर शहरातील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्त्यांनी कामगार हॉस्पिटल श्रीरामपूर या ठिकाणी जाऊन पिढीत युवक व कुटुंबाची भेट घेऊन तब्येतीची विचारणा केली, झालेला प्रकार अत्यंत निंदनीय असून मनुवाद अहमदनगर जिल्ह्यात पुनः मान वर काढू लागला आहे..
घटनेतील मुख्य आरोपी नाना गलांडेला अद्याप अटक झालेली नाही.
तरी नाना गलांडे यास तात्काळ अटक झाली पाहिजे. व पीडित युवक व कुटुंबास शासकीय आर्थिक मदत मिळाली पाहिजे ही प्रमुख मागणी कार्यकर्त्यांमार्फत यावेळी करण्यात आली.
नाना गलांडे यास लवकरात लवकर अटक न झाल्यास समस्त आंबेडकरी समाजामार्फत अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येईल. याची पोलिस प्रशासनानी नोंद घ्यावी.असा ईशाराही देण्यात आला.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती समितीचे अजय साळवे मेंबर,सुरेश भाऊ बनसोडे,सुमेध भाऊ गायकवाड,सोमा भाऊ शिंदे, सिद्धार्थ आढाव सर, समिर भाऊ भिंगारदिवे आदी उपस्थित होते.