सामाजिक

“रक्तदान म्हणजे जीवनदान.” -प्राचार्य डॉ. शेषराव पवार

पाथर्डी दि.३१ जुलै (प्रतिनिधी)

विविध सामाजिक संस्थांना एकत्रतीत आणून श्री आनंद महाविद्यालय पाथर्डी राष्ट्रीय सेवा योजना, शुंभकरोती ऑर्गनायझेशन, शिक्षक मित्र परिवार, वसंतराव नाईक वाचन मंदिर, साई सेवा प्रतिष्ठान, बालनंद परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने जगदंबा सेवालाल मंदिर आनंदनगर पाथर्डी येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.*
*महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा शेषराव पवार व सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत पवार यांनी शिबीरात सहभागी होणाऱ्या सर्व रक्तदात्यांना शुभेच्छा देऊन या शिबीराचे ऊद्घाटन केले. त्यावेळी बोलताना प्राचार्य डॉ . शेषराव पवार म्हणाले की रक्तदान हे आत्यंत महत्वाचे आहे यामुळे आपण कोणाला तरी नवजीवन देत असतो .सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागाने आज एक नवीन सामाजिक उपक्रम पार पडला. निसर्गासारखं निस्वार्थी जगून मानवानेही समाजाचे काही तरी देणं लागतो या भावनेने पर्यावरणप्रेमी सन्माननीय श्री संदीप राठोड सर, प्रोफेसर डॅा. मुक्तार शेख, प्रा. सुर्यकांत काळोखे,प्रा. डॉ. बथुवेल पगारे, प्रा. अनिता पवासे, प्रा. डॅा. इस्माईल शेख, गणेश कांबळे सर , लहू बोराटे सर ,प्रा. संतराम साबळे, नारायण मंगलाराम सर, राकेश पवार सर, युवराज सर, सचिन चव्हाण सर आणि सर्व बालानंद परिवार, सावरू ग्रुप मधील तसेच इतर ग्रुप मधील कार्यकर्ते, सर्वांनी एक वेगळीच रक्तदानाची चळचळ सुरू करून मानवी जीवनात एक अनोखे संवेदनशीलतेचे, मानवतेचे नाते लक्षात घेऊन, एकत्र येऊन शिबीर यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. या शिबिरात एक्कावन्न रक्तदात्यांनी ऊत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन शिबीर यशस्वीरित्या पार पाडले. प्रा. डॅा. नितीन ढुमणे, प्रा. डॅा. अशोक वैद्य, नाना केळगंद्रे, गौतम भंडारी, प्रा इंद्रजित बोरले, अभिजीत सरोदे, दिलीप पानखडे, शैलेश उगार, सुयोग कोळेकर, योगेश शिंदे, शिरसाठ सर , श्री आनंद महाविद्यालयातील आजी व माजी विद्यार्थी इंत्यादींनी या शिबीरात रक्तदान केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे